गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘अपॉईंटमेंट घेऊनच तपासणीसाठी यावे’

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘अपॉईंटमेंट घेऊनच तपासणीसाठी यावे’
Goa Medical College Management has started the service of OPD


पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथील व्यवस्थापनाने ओपीडीची सेवा सुरू केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी तपासणीसाठी वेळ घेतलेली आहे, त्‍यांना तपासले जाणार असल्याची माहिती मिळाली. 


गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी माहिती दिली की, वेळ घेऊन रुग्णांना तपासले जात असल्याने ५० टक्के गर्दी कमी झाली आहे. एकतर रुग्णांना फोनवरून अपॉईंटमेंट घ्याव्या लागतात किंवा ते प्रत्यक्षात येऊनसुद्धा अपॉईंटमेंट्स घेऊ शकतात; सल्लामसलत करण्यासाठी काही विशिष्ट प्रोटोकॉल ठेवावे लागतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोमेकॉत काही विशेष नियम केले आहेत. विनाकारण लोकांना मोठ्या संख्येत इस्पितळात सोडू नये यासाठी मुख्य द्वारावर सुरक्षारक्षकांना तैनात केले आहे.

आणखी वाचा:

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com