Goa: शांतादुर्गाच्या 'विद्यावर्धन' स्मरणिकेचे सभापतींच्या हस्ते प्रकाशन

"विद्यावर्धन"स्मरणिकेचे डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
Goa: शांतादुर्गाच्या 'विद्यावर्धन' स्मरणिकेचे 
सभापतींच्या हस्ते प्रकाशन
Vidyavardhak MandalDainik Gomantak

डिचोलीतील विद्यावर्धक मंडळ (Vidyavardhak Mandal) संचलित श्री शांतादुर्गा विद्यालयाच्या (Shantadurga Vidyalaya) "विद्यावर्धन"स्मरणिकेचे डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रगतीचा आढावा घेणाऱ्या या स्मरणिकेचे एडना रोडिग्स (Edna Rodriguez) आणि मेल्वीन मोंतेरो (Melvin Montero) यांनी संपादन केले आहे.

Vidyavardhak Mandal
Goa: डिचोली शांतादुर्गा देवस्थानात आषाढी एकादशीला भजनी सप्ताह

स्मरणिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) खजिनदार राजेश धोंड, शांतादुर्गा उच्च माध्यमिकचे व्यवस्थापक अरुण साळकर, माध्यमिक विभागाचे व्यवस्थापक राजाराम चणेकर, साधनसुविधा विकास विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, क्रीडा अकादमीचे व्यवस्थापक अभिजित तेली, मुख्याध्यापिका श्रद्धा आसकावकर, शिक्षिका यास्मिन शेट्ये, एडना रॉड्रिग्स आणि मेल्वीन मोंतेरो उपस्थित होते. मुख्याध्यापिका आसकावकर यांनी स्वागत केले.

Related Stories

No stories found.