खोतीगावातील केरी वाड्यावरील मुले व वृद्ध महिलांची कैफियत

खोतीगावातील दुर्गम केरी वाड्याचे भाग्य केव्हा उजळणार युवा पिढी समोरील प्रश्न
खोतीगावातील केरी वाड्यावरील मुले व वृद्ध महिलांची कैफियत
खोतीगावातील केरी वाड्यावरील एक घरDainik Gomantak

काणकोणमधील खोतीगावातील दुर्गम केरी वाड्याचे भाग्य केव्हा उजळणार असा प्रश्न येथील युवा पिढी समोर आहे. येथील अनेक पिढ्यानी मिणमिणत्या रॉकेलच्या दिव्याच्या उजेडाखाली रात्री काढल्या आजही गोव्याला मुक्ती मिळून साठ वर्षे झाली तरी येथील रहिवासी रस्ता,वीज, व पेयजल या मूलभूत सेवा पासून वंचित आहेत.हागणदारी मुक्त राज्य करण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र या वाड्यावरही एकही सुलभ शौचालय उभारण्यास सरकारला यश आले नाही.

सुमारे पंधरा घरे व शंभर पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या वाडा खोतीगाव अभयारण्याच्या कक्षेत येत आहे अभयारण येथील रहिवाशांना शाप ठरले आहे.खरे म्हणजे येथील अनेक पिढ्यांनी जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी योगदान दिले मात्र त्यानाच वनखात्याच्या जाचक अशा निर्बंधाना सामोरे जावे लागते.या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाची सूद्धा सोय नाही.कनेक्टिव्हिटी नाही.त्यामुळे येथील मुलाना नातेवाईकांकडे किंवा वसतीगृहात राहून शिक्षण घ्यावे लागते.वयोवृद्ध ,आजारी तसेच गरोदर महिलांना पाळण्यात घालून येडा पर्यंत आणून त्यानंतर वाहनातून इस्पितळात नेण्यात येते.

खोतीगावातील केरी वाड्यावरील एक घर
Goa: मुख्यमंत्र्यांनी दाखवली राजकीय मुत्सद्देगिरीची चमक

खोतीगावातील येडा पर्यंत डांबरी रस्ता आहे त्यानंतर नडके पर्यंत मातीचा रस्ता तुडवत नडके येथे जावे लागते तेथून सुमारे एक तास चढण चढून गेल्यानंतर डोंगर माथ्यावर हा वाडा आहे.गर्द झाडी,नाले ओलांडत येथील रहिवाशांना आपला वाडा गाठावा लागतो.बारा वर्षामागे येथील रहिवाशांना सौर विजेवर चालणारे दिवे देण्यात आले होते मात्र संबंधीत यंत्रणेने वेळोवेळी त्यांची दुरुस्ती न केल्याने ते कुचकामी ठरले आहेत.किमान वाड्यावर दुचाकी नेण्यासाठी दोन मीटरचा रस्त्याची त्याची मागणी आहे.येथील युवा रहिवाशांनी दोन वर्षामागे श्रमदानातून कच्चा रस्ता काढला होता मात्र वनखात्याने त्याला आक्षेप घेतला.

त्याचा राग येथील युवकांमध्ये धुमसत आहे. केव्हा त्याचा स्फोट होईल सांगता येत नाही.उपसभापती व काणकोणचे आमदार यांनी मध्यस्थी करून दुचाकीसाठी रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन त्याना दिले आहे.भूमीगत वीज वाहिन्या घालून या वाड्याला वीज पुरवठा करणे शक्य आहे.त्यासाठी श्रमदानातून वीज वाहिन्या साठी चर खणण्याची तयारी त्याचप्रमाणे वीज साहित्य नडके येथू वाड्यापर्यत नेऊन देण्याची तयारी युवकांनी दर्शवली आहे.

खोतीगावातील केरी वाड्यावरील एक घर
GPSC Recruitment: 71 पशुवैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरू

गैरसोयीमुळे युवकाचे स्थलांतर

वाड्यावर कोणत्याच मूलभूत सोयी उपलब्ध नसल्याने येथील युवा पिढीने काम व्यवसायानिमित्त काणकोणच्या अन्य भागात स्थलांतर केले आहे.मात्र त्यांची देवदेवस्की व वयोवृद्ध मंडळी वाड्यावर असल्याने ते वाड्यावर जातात.

शिमगा, गणेशोत्सव व अन्य सणाला ते आवर्जून उपस्थिती लावून धार्मिक कार्ये करतात. त्याना जवळचा मार्ग म्हणजे सांगे तालुक्यातील साळजीणी वाडा.तिथे पर्यंत गणेश मूर्ती आणून त्यानंतर मूर्ती डोक्यावरून अर्धातास पायपीट करून ती घरात आणावी लागते.यंदाही येथील रहिवाशांनी खडतर दिव्यातून जात मिणमिणत्या प्रकाशात गणेश चतुर्थी साजरी केली. मात्र त्यांचा उत्साह तिसूभरही कमी झाला नाही कारण ते आशेचे पुजारी आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com