पर्यटक टॅक्सीमालकांचे धरणे; गोवा माईल्‍स टॅक्‍सी सेवा रद्द करा

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

गोवा सरकारने गोवा माईल्स ही ॲपवर आधारीत टॅक्सी सेवा रद्द करावी. त्यानंतर टॅक्सींना मिटर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली आहे.

पणजी : गोवा सरकारने गोवा माईल्स ही ॲपवर आधारीत टॅक्सी सेवा रद्द करावी. त्यानंतर टॅक्सींना मिटर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली आहे. राज्यातील पर्यटक टॅक्सीमालकांनी आज पणजी येथील आझाद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलन करून गोवा माईल्स ही ॲपवर आधारीत टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी केली. 

गोवेकरांनो नियम मोडण्याआधी जाणून घ्या नवा वाहतुक कायदा 

टॅक्सीमालक संघटनेचे नेते बाप्पा कोरगावकर यांच्या नेतृत्त्‍वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. गोवा सरकारने राज्यातील टॅक्सीचालकांना व मालकांना विश्‍वासात न घेता गोवा माईल्स ॲप टॅक्सीसेवा सुरू केली आहे. त्यामुळे गोमंतकीय टॅक्सीचालकांना मोठे नुसकान होत असल्याने गोवा माईल्स बंद करुन आम्हांला न्याय द्यावा, अशी मागणी श्री. कोरगावकर यांनी केली.

मीटरऐवजी वेबसाईटवर दर जाहीर करा : रेजिनाल्‍ड
काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी टॅक्सीचालकांची भेट घेतली व त्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला. गोवा पर्यटक राज्य आहे, मात्र येथील पर्यटक उद्योग व हॉटेल्स परप्रांतीयांच्या ताब्यात गेले आहेत. फक्त, टॅक्सी व्यवसाय तेवढाच गोमंतकीयांच्‍या ताब्यात आहे. त्यामुळे सरकारने त्यांचे हित जपावे, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, गोवा माईल्स टॅक्सी सेवेमुळे गोमंतकीय टॅक्सीचालकांना नुकसान होत असल्याने ती सेवा बंद करावी व त्यानंतर अवश्‍‍य टॅक्सीना मिटर बसवावेत, अशी मागणी रेजिनाल्ड यांनी केली. मिटर बसवण्यापेक्षा टॅक्सींचे दर वेबसाईटवर जाहीर करा, असेही रेजिनाल्ड म्हणाले.

संबंधित बातम्या