Goa Mine Auction: सर्वोच्च न्यायालयाने खाण लिलाव अंतरिम स्थगिती देण्याची याचिका फेटाळली!

Goa Mine Auction: गोवा खंडपीठात आव्हान याचिकेवर 12 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
Goa Mine Auction
Goa Mine AuctionDainik Gomantak

Goa Mine Auction: राज्यातील खाणपट्‍ट्यांवर ताबा मिळवण्यासाठी खाण कंपन्यांनी केलेले प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून हाणून पाडल्यानंतर पुन्हा आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात एमएसपीएल लिमिटेड कंपनीने खाणपट्ट्यांच्या लिलावाला याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

या याचिकेवरील प्राथमिक सुनावणीवेळी लिलावाच्या प्रक्रियेला अंतरिम स्थगिती देण्याची केलेली विनंती उच्च न्यायालयाने फेटाळली. सरकारला खंडपीठाने नोटीस बजावून उत्तर देण्याचे निर्देश देऊन ही सुनावणी 12 डिसेंबरला ठेवली आहे. राज्य सरकारने 4 मे 2022 रोजी खाणपट्टीधारकांना त्यांचा खाण क्षेत्रातील खनिज माल तसेच यंत्रसामग्री बाहेर काढण्यास एका महिन्याची मुदत दिली होती.

Goa Mine Auction
Goa Latest News: 'विद्यार्थ्यांना वाचनाशिवाय पर्याय नाही' - दिलीप बेतकेकर

या मुदतीत अनेक खाण कंपन्या उच्च न्यायालयात गेल्या होत्या. एकत्रितपणे सर्व याचिकांवर सुनावणी घेऊन राज्य सरकारच्या आदेश कायम ठेवून या सर्व याचिका फेटाळल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही नशीब आजमावण्यासाठी धाव घेतली होती. तेथे त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने गोवा फाऊंडेशनच्या दोन वेगवेगळ्या याचिकांत दिलेल्या निवाड्यात खाणपट्ट्यांच्या नुतनीकरणाची मुदत 2007 मध्ये संपल्याने त्यावर त्यांचा अधिकार राहिला नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्य सरकारने खाणपट्ट्या लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. या लिलावासाठी देशभरातून अनेकांनी अर्ज केले आहेत. ही मुदत या महिना अखेरपर्यंत असून त्यानंतर लिलावाला सुरुवात होणार आहे.

बाधा आणण्याचा कंपन्यांचा प्रयत्न अयशस्वी

सरकारने चार खाणपट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. गेल्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या 79 पानी निवाड्यामुळे सरकारच्या प्रक्रियेला बाधा ठरणारा खाण कंपन्यांच्या याचिकेचा अडथळाही दूर होऊन कंपन्यांच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. आता कोणताच मुद्दा हाती उरला नसल्याने खाण व्यावसायिकांनी लिलाव प्रक्रियेला पुन्हा आव्हान देऊन अंतरिम स्थगिती मिळवून त्यात बाधा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com