खाण प्रभावित कर्जदारांसाठी कर्जमुक्ती योजनेचा निर्णय..

या लोकांसाठी लागू करण्यात येणार योजना..
खाण प्रभावित कर्जदारांसाठी कर्जमुक्ती योजनेचा निर्णय..

Goa Mining 

Dainik Gomantak

गोवा: राज्य सरकारने खाण (Goa Mining) प्रभावित कर्जदारांसाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी कर्जमुक्ती योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून खाणकाम बंद असल्यामुळे कर्जाची परतफेड करणे कठीण होऊन बसलेल्या अनेक कर्जदारांच्या विनंतीनंतर मंत्रिमंडळाने ही योजना वाढवली आहे. या वेळी ही योजना ज्यांनी त्यांची रक्कम भरली नाही आणि ज्या बँकांनी अनुदान जारी करण्यासाठी राज्य-संचलित आर्थिक विकास महामंडळ (EDC) लिमिटेडकडे दावे सादर केले नाहीत त्यांना लागू करण्यात येणार आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Mining&nbsp;</p></div>
माडगावचा सुनियोजित विकास हा कधी झालाच नाही...

खाणी (Goa Mining) संदर्भात गोवा सरकारची भूमिका

गोव्यातील (Goa) बंद पडलेल्या खाणी सुरू करण्यासाठी ही कायदा दुरुस्ती करावी अशी गोवा सरकारची मागणी आहे. या कायद्यातील ही दुरुस्ती गोवा सरकारच्या (Goa Government) मागणीनुसार होत आहे की देशभरातील इतर खाणपट्ट्यांचा लिलाव सुरळीत होण्यासाठी करण्यात येत आहे हे मात्र समजू शकलेले नाही. गोव्यातील पोर्तुगीजकालीन खाण परवान्यांचे खाणपट्ट्यांत (Mining) रूपांतर करणारा करणाऱ्या 1987 च्या कायद्यात दुरुस्ती करावी असेही गोवा सरकारचे म्हणणे आहे, मात्र त्याविषयी केंद्र सरकारने फारशी दखल घेतली नाही असे सध्या दिसते.

88 खाणपट्ट्यांचे दुसऱ्यांदा केलेले नूतनीकरण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केले रद्द

गेली दोन वर्षे 88 खाणपट्ट्यांचे दुसऱ्यांदा केलेले नूतनीकरण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर गोव्यातील खाणकाम बंद आहे. सध्या ईलिलाव पुकारलेल्या खनिज मालाची वाहतूक केली जात असल्याने खाण भागातील लोकांना काही प्रमाणात काम मिळाले आहे. गोव्यातील विधानसभेच्या येत्या निवडणुकीत बंद पडलेले खाणकाम हा प्रमुख मुद्दा असू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com