Sudin Dhavalikar :कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?; मंत्री सुदिन ढवळीकरांची खोचक टिप्पणी

गोव्यातील भाजप सरकारमध्ये मंत्री असणारे सुदिन ढवळीकरांनी देखील पक्षांतराच्या दोन दिवसांनंतर यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar Dainik Gomantak

Sudin Dhavalikar : काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये पक्षांतर केले आणि गोव्यात मोठा राजकीय भूकंप झाला. देवाला साक्षी माणून कधीही पक्षांतर करणार नाही अशी शपथ घेतलेल्या आमदरांना सात महिन्यांतच आपल्या शपथीचा विसर पडला अन् त्यांनी पक्षांतर केले. यामध्ये काँग्रेसमधील जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांचा देखील समावेश असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पक्षांतरावर सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

गोव्यातील भाजप सरकारमध्ये मंत्री असणारे सुदिन ढवळीकरांनी देखील पक्षांतराच्या दोन दिवसांनंतर यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर मंत्रालयातील आपल्या कक्षात बसले असताना त्यांना काँग्रेस आमदारांच्या पक्षांतराबाबत प्रश्न विचारला असता त्यांना, ‘सामना’ चित्रपटातील ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गीताच्या ओळी आठवल्या. मंत्री ढवळीकर यांनी या गीताच्या ओळी गात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Sudin Dhavalikar
Digambar Kamat : दिगंबर कामतांना मडगाव नगराध्यक्ष निवडणुकीत जोरदार धक्का

मंत्रिमंडळात स्‍थान कुणाला ?

दरम्यान, काँग्रेसमधून आलेल्या आठ आमदारांना पक्षप्रवेश दिल्याने भाजपचे संख्याबळ वाढले आहे. पण, बंडखोर आमदारांनी तीन मंत्रिपदांची मागणी केली आहे. यासाठी मंत्रिमंडळातून तीन मंत्र्यांना कमी करावे लागणार आहे. यात सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मच्छीमार मंत्री नीळकंठ हर्ळणकर किंवा कृषिमंत्री रवी नाईक यांचा नंबर लागू शकतो. त्याजागी विद्यमान बंडखोर मायकल लोबो, आलेक्स सिक्वेरा आणि अन्य एकाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com