Goa: शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आमदार सरदेसाई यांची सरकारकडे मागणी

आपण गेले 15 वर्षे फातोर्डातील शेतकऱ्यांना मदत करीत आहे. फातोर्डा हिरवेगार व स्वच्छ व्हावे याला मी सदैव प्राधान्य दिले आहे.
Goa: शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आमदार सरदेसाई यांची सरकारकडे मागणी
शेतात भाताच्या रोपट्यांची लागवड करताना फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, त्यांच्या पत्नी उषा सरदेसाई व गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते.Dainik Gomantak

फातोर्डा: कोविड (COVID19) महामारीमुळे शेतकऱ्यांनाही भयंकर त्रास सोसावा लागला. तांच्या कृषी उत्पादनावरही परिणाम झाला. मात्र सरकारने अजुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत (Financial assistance to farmers) देण्याचे जाहीर केलेले नाही. जे शेतकरी फळे, फुलांची लागवड करतात त्यांचेही सरकारी अनुदान मिळालेले नाही. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत (Help) द्यावी अशी मागणी फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. 

आज विजय सरदेसाईने गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत शेतात भाताच्या रोपट्यांची लागवड केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाऊसाहेब बांदोडकर यांनी ऊस शेतीला प्राधान्य देतानाच व ऊस शेतकऱ्यांना मदत रुप ठरावा म्हणून साखर कारखाना सुरु केला होता. या सरकारने ऊस शेतीचा विश्र्वासघात केला असुन साखर कारखानाही बंद पाडला असा आरोप सरदेसाई यांनी केला.

शेतात भाताच्या रोपट्यांची लागवड करताना फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, त्यांच्या पत्नी उषा सरदेसाई व गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते.
Goa Elections: काँग्रेसने युतीसंदर्भात निर्णय घ्यावा, विजय सरदेसाईंचे वक्तव्य

जर शेतकऱ्यांना सरकार मदत करीत नसेल तर त्यांनी कसे जगावे? शेतकऱ्यांनी जमीन रुपांतरीत करुन जगावे असे सरकारला वाटते का? असा प्रश्र्नही सरदेसाईने सरकारला केला आहे.

आपण गेले 15 वर्षे फातोर्डातील शेतकऱ्यांना मदत करीत आहे. फातोर्डा हिरवेगार व स्वच्छ व्हावे याला मी सदैव प्राधान्य दिले आहे. फातोर्डातील एकही शेत पडंग राहता कामा नये असे आपल्याला वाटते असेही सरदेसाईने सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com