Goa: शिवोलीत माझ्या कारकीर्दीत भरपूर विकासकामे झाली: विनोद पालयेंकर
हणजुण पंचक्रोशीतील वीज उप केद्राचे फीत कापून उद्घाटन करतांना आमदार विनोद पालयेंकर (Goa)Dainik Gomantak / Santosh Govekar

Goa: शिवोलीत माझ्या कारकीर्दीत भरपूर विकासकामे झाली: विनोद पालयेंकर

शिवोलीचे विद्यमान आमदार विनोद पालयेंकर यांनी हणजुणात स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला (Goa)

Goa: शिवोली मतदार (Siolim Constituency) संघावर अद्याप माझेच प्रभुत्व आहे. त्यामुळे मायकल लोबोंच्या पत्नीच काय? तर, ते स्वतः जरी शिवोली मतदार संघातून लढले तरी त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही (MLA Michel Lobo), असे शिवोलीचे विद्यमान आमदार विनोद पालयेंकर (Siolim MLA Vinod Palyekar) यांनी हणजुणात (Anjuna) स्थानिक पत्रकारांशी बोलतांना सांगितले. हणजुण येथील 33 केवी वीज उप-केंद्राचे वीजमंत्री निलेश काब्राल यांच्या अनुपस्थितीत फीत कापून तसेच नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान गावकरी तसेच वीज खात्याशी संबंधित कर्मचार्यांची उपस्थिती होती.

हणजुण पंचक्रोशीतील वीज उप केद्राचे फीत कापून उद्घाटन करतांना आमदार विनोद पालयेंकर (Goa)
Goa: आव्हानांचा डोंगर पेलण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवा

गेल्या चार वर्षात विविध विकासकामे राबवली; शिल्लक कामे ऑक्टोबरपासून मार्गी लागणार

पालयेंकर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना यादरम्यान हणजुण कायसुव पंचायतीचे सरपंच सावियो आल्मेदा, वीज खात्याचे वरिष्ठ अभियंता स्टिफन, तसेच स्थानिक कोमुनिदादचे अध्यक्ष डॉमनिक परैरा हे व्यासपीठावर उपस्थित होते. शिवोली मतदार संघात आपण गेल्या चार वर्षात विविध विकासकामे राबवून लोकांच्या पसंतीस उतरलो असून राहिलेली कामे ऑक्टोबरपासून मार्गी लागणार असल्याचे त्यांनी आश्वासन केले.

हणजुण पंचक्रोशीतील वीज उप केद्राचे फीत कापून उद्घाटन करतांना आमदार विनोद पालयेंकर (Goa)
Goa Court: परवाना रद्द केल्याचे प्रकरणं दाखवा

हणजुण पंचक्रोशीतील वीज समस्या दूर करण्यासाठी वीज उप-केंद्राची स्थापना

दरम्यान, हणजुण पंचक्रोशीतील वीज समस्या कायमची दूर करण्याच्या हेतूने 33केवी क्षमतेच्या  वीज उप- केंद्राची स्थापना (Establishment of power sub-station) करण्यात आली असून, लवकरच बादें येथे पुर्ण क्षमतेचे वीज केंद्र उभारण्यात येणार असल्याचे पालयेंकर यांनी सांगितले. यावेळी सरपंच सावियो आल्मेदा, वीजकेंद्राचे मुख्य अभियंता स्टीफन न्यून यांची समयोजीत भाषणे झाली.

Related Stories

No stories found.