डिचोलीत फायर स्टेशनजवळ पत्र्यांची पडझड

जोरदार पावसामुळे ‘मॉर्डन फायर स्टेशन’ येथे बांधलेल्या शेडच्या पत्र्यांची पडझड
Rain
Rain Dainik Gomantak

डिचोली : जोरदार पावसामुळे शहरातील रेंगाळलेल्या ‘मॉर्डन फायर स्टेशन’ या प्रकल्पस्थळी बांधलेल्या शेडच्या पत्र्यांची पडझड होण्याचा प्रकार घडला आहे. शेडच्या पत्र्यांची पडझड झाली असतानाच, प्रकल्पाच्या सभोवताली उभारण्यात आलेल्या पत्र्यांचीही नासधूस झाली आहे.

या प्रकल्पस्थळी कामगारांना राहण्यासाठी शेड बांधल्या आहेत. मात्र, प्रकल्पाचे काम ठप्प असल्याने गेल्या काही महिन्यांपासून प्रकल्पस्थळी कोणाचेच वास्तव्य नाही. त्यामुळे पावसात प्रकल्पस्थळी झालेल्या पडझडीकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. फायर स्टेशनजवळ प्रकल्पाचे काम सुरू असून, पावसातच पत्रे पडल्याने आता झालेल्या कामावर तात्पुरते प्लास्टिक आच्छादनाची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com