Goa: विद्यार्थ्यांच्या श्रमातून जमवलेले पैशांची पूरग्रस्तांना मदत

तीन सरकारी प्राथमिक विद्यालयाची समाजसेवेचे आदर्श निर्माण करणारे कार्य
Goa: बोणकेवाडा वांते येथे मदत निधी सुपूर्द करताना धाकटु पाटील व इतर
Goa: बोणकेवाडा वांते येथे मदत निधी सुपूर्द करताना धाकटु पाटील व इतरDainik Gomantak

Goa: डिचोली (Bicholim) तालुक्यातील साळ पुनर्वसन व शिरगाव आणि तिसवाडी तालुक्यातील धुळापी खोर्ली अशा तीन सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून (School Students) समाजसेवेचे (Social work) आदर्श निर्माण करणारी कामगिरी बजावली आहे.

Goa: बोणकेवाडा वांते येथे मदत निधी सुपूर्द करताना धाकटु पाटील व इतर
गोव्यात राजकीय हालचालींना पुन्हा वेग; फोलेरो कोलकात्याला रवाना

जुलै महिन्यात सत्तरीत म्हादई पुराने अनेकांची घरे जमीनदोस्त होऊन लोकांना बेघर बनवले गेले. अशा बेघर झालेल्या लोकांच्या मदतीसाठी आपला खारीचा वाटा उचलण्याची कार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले असून रक्षाबंधनाच्या माध्यमातून त्यांनी निधी उभा करून तो बोणकेवाडा वांते सत्तरी येथील एका कुटुंबाला प्रदान केला.

Goa: बोणकेवाडा वांते येथे मदत निधी सुपूर्द करताना धाकटु पाटील व इतर
Rabies नियंत्रणात ठेवणारे गोवा राज्य देशात पहिले

या आदर्शवत कार्याची सुरुवात झाली ती अशी, साळ पुनर्वसन विद्यालयाचे शिक्षक संकेत नाईक यांनी म्हादईपुरामुळे नुकसानग्रस्त लोकांची व्यथा आपल्या सहकारी शिक्षक व इतर दोन विद्यालयातील शिक्षकाकडे मांडली आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून मदत कार्य उभारण्याची ठरविले. त्याचवेळी रक्षाबंधनाचा सण जवळ आला होता. रक्षाबंधनाच्या माध्यमातून निधी उभारण्याचा संकल्प केला आणि त्यानंतर प्रत्येक शिक्षकांनी आपआपल्या विद्यार्थ्यांसमोर ही संकल्पना मांडली. त्यानंतर प्रत्येक मुलांनी आपली कला-कौशल्य वापरत छान पैकी राख्या बनवल्या व मग त्या राख्यांची विक्री राखी प्रदर्शन घडवून आणून केली. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या हेतूने राख्या बनवण्यापासून ते त्याची विक्री होईपर्यंत विद्यार्थ्यांनी खुप मेहनत घेतली. आणि त्यातून निधी गोळा केला. शेवटी नुकताच हा निधी बोणकेवाडा येथील उत्तम गावकर या गरीब कुटुंबाला प्रदान केला.

Goa: बोणकेवाडा वांते येथे मदत निधी सुपूर्द करताना धाकटु पाटील व इतर
Goa Temple: दारे उघडली, आता भक्तांपुढे असेल आव्हान

यावेळी त्यांच्याकडून एकूण 10 हजारची रक्कम सुपूर्द केली. यासंबंधी संकेत नाईक यांनी सांगितले की जरी ही छोटीशी रक्कम दिसत असली तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार मोठी आहे. कारण त्यांनी ती स्वतः राख्या बनवण्याचे व त्यांची विक्री करण्याचे कष्ट घेतले. या उपक्रमातुन आम्ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी हा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. आपले मित्र मंडळी, सगे सोयरे यांच्यासाठी मदत करणे सहज होते पण आजूबाजूला अनोळखी दुःखात असलेली लोकांविषयी संवेदना निर्माण होणे गरजेचे आहे. अशी जाणीव मुलांमध्ये रुजवावी आणि त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या हेतूने हा कार्यक्रम घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ही रक्कम सुपूर्द करण्यासाठी काही विद्यार्थ्यांना सोबत नेले होते. त्यावेळी त्यांच्याशी पूरग्रस्तांच्या दुःखाविषयी माहिती देत त्यांनी सोसत असलेल्या यातनांनी जाणीव करून दिली. यावेळी मुलांमध्ये त्यांच्याबद्दल संवेदना निर्माण झाल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.

Goa: बोणकेवाडा वांते येथे मदत निधी सुपूर्द करताना धाकटु पाटील व इतर
हिंदी दिवसानिमित इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा तर्फे हिंदी सृजनोत्सव चे आयोजन

या मदतनिधी सुपूर्द करतेवेळी साळ पुर्नवसन विद्यालयाचे शिक्षक धाकटु पाटील, संकेत नाईक, शिरगाव विद्यालयाच्या शिक्षिका योगिता पुनाळेकर, सुमिता फडते, जागृती नाईक, धुळापीचे शिक्षिका वर्षा मालवणकर, शिल्पा राणे तसेच पालक ऋतुजा गवस, ध्रुवांजय हरमलकर, व पालवी नाईक, दुर्वा पाटील, स्वराली गवस, स्वारा सावंत हे विद्यार्थी सोबत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com