Goa Monsoon: राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज, प्रशासन हाय अलर्टवर

पुढील 48 तासांदरम्यान उत्तर आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर (Bay of Bengal) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये दक्षिण कोकण (South Konkan) आणि गोव्यात (Goa) पावसाची शक्यता आहे.
Goa Monsoon: राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज, प्रशासन हाय अलर्टवर
गोव्यातील (Goa) अनेक जिल्ह्यात पुढील 3-4 तासांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह पावसाची (Rain) शक्यता आयएमडीकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे. Dainik Gomantak

उत्तर गोवा (North Goa) आणि दक्षिण गोव्यातील (South Goa) अनेक जिल्ह्यात पुढील 3-4 तासांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह पावसाची (Rain) शक्यता आयएमडीकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे. रविवारपासून गोवा प्रशासन हाय अलर्टवर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोव्याची राजधानी पणजी (Panaji) आणि राज्यातील इतर शहरांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.

गोव्यातील (Goa) अनेक जिल्ह्यात पुढील 3-4 तासांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह पावसाची (Rain) शक्यता आयएमडीकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
Goa Rain Updates: परतीच्या पावसाचा डिचोलीत तडाखा

उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नियंत्रण कक्ष सक्रिय केले असून, लोकांना त्यांच्या भागात पूर आल्यास सतर्क राहण्यास सांगितले आहे. गेल्या महिन्यात देखील, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर आला होता. पण यावेळी प्रशासन सज्ज आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी सांगितले की, पुढील 48 तासांदरम्यान उत्तर आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये दक्षिण कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता आहे. 5, 6 आणि 7 सप्टेंबर रोजी गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकाणी मुसळधार पाऊस (24 तासांमध्ये 11.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त) होण्याची शक्यता आहे. या कालावधीत उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गोव्यातील (Goa) अनेक जिल्ह्यात पुढील 3-4 तासांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह पावसाची (Rain) शक्यता आयएमडीकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
Goa Monsoon Update: परतीचा पाऊसही जोरदार बरसणार?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वादळी पावसासह सुमारे 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे भूस्खलन आणि पुरख्या असुरक्षित क्षेत्रांवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. आयएमडीने राज्य सरकारला नद्या आणि जलाशयांमधील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करुन आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्याच्या किनारपट्टी भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने राज्य प्रशासन हाय अलर्टवर आहे.

Related Stories

No stories found.