Goa Monsoon: राज्यात तीन दिवस मुसळधार,हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे सोमवारपासून राज्यात सलग तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे (Goa Monsoon).
Goa Monsoon: Metrological department declare yellow alert, heavy rain in next three days
Goa Monsoon: Metrological department declare yellow alert, heavy rain in next three daysDainik Gomantak

गेले दोन दिवस राज्यात पावसाने बहुतांश भागात ‘ब्रेक’ घेतला. वाळपई आणि सांंगे येथे मात्र शनिवारी तुरळक सरी बरसल्या. या हंगामातील ही सर्वात निच्चांकी (0.1 मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे . आता बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे सोमवारपासून राज्यात सलग तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे (Goa Monsoon). हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे.(Goa Monsoon: Metrological department declare yellow alert, heavy rain in next three days)

दरम्यान, अचानक पावसाचा जोर ओसरल्याने उष्म्याने गोवेकर त्रस्त झाले आहेत. परंतु, उद्या सोमवारपासून सलग तीन दिवस राज्यात मुसळधार बरसात होईल, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे. त्यासाठी राज्यात तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Goa Monsoon: Metrological department declare yellow alert, heavy rain in next three days
Goa: राज्यात NCBच्या कारवाया,24जणांना अटक मोठ्या प्रमाणात आम्ली पदार्थ जप्त

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने या भागात कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) तयार झाले आहे. याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत आहेत. रविवारी संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ दक्षिण ओडिशा व आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला असून, हे वादळ महाराष्ट्राकडे येण्याची चिन्हे आहेत.

याबाबत बोलताना कोलकाता हवामान विभागाचे संचालक जी के दास यांनी ईशान्य आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर एक चक्रीवादळ निर्माण होत आहे. येत्या 24 तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र असेल आणि ते 29 सप्टेंबरपर्यंत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पोहोचेल. 28 आणि 29 सप्टेंबरला येथे मुसळधार पाऊस पडेल. 28 सप्टेंबर रोजी कोलकाता, उत्तर 24 परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, झारग्राम, हावडा, हुगळी येथे मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com