Goa Live Update: राज्य सरकारला झटका, पंचायत निवडणुकी संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

निवडणूक ठरल्याप्रमाणे 10 ऑगस्टलाच होणार.
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak

Goa Live Update: राज्यातील मागील चार ते पाच दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने गोमंतकीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील सर्वच भागात पावसाच्या मुसळधार हजेरीमूळे काही ठीकाणी शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. तसेच रस्ते ही पाण्याखाली जात आहेत. मात्र आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.

Summary
  • राज्य सरकारला झटका, पंचायतीच्या निवडणुका संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलावेत यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून निवडणूक ठरल्याप्रमाणे 10 ऑगस्टलाच होणार.

Summary
  • आज सायंकाळपर्यंत आम्हाला सेवेत न घेतल्यास पाण्याचाही त्याग करणार : आंदोलक अंगणवाडी सेविकांचा इशारा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सरकारला लेखी हमी देणार नाही. आणि आज सायंकाळपर्यंत आम्हाला सेवेत न घेतल्यास पाण्याचाही त्याग करणार असा इशारा आंदोलक अंगणवाडी सेविकांनी दिला.

Summary
  • ओबीसी संदर्भात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठ फेटाळली

प्रभाग फेररचना व ओबीसी आरक्षणावरून सुरवातीपासूनच पंचायत निवडणुका वादग्रस्त ठरत आहेत. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या एससी, एसटी व महिला आरक्षणाबाबत बदल करण्याची याचिका गोवा खंडपीठाने आज फेटाळून लावली. तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत यासंदर्भातील याचिकेवरची सुनावणी आज पूर्ण झाली. याबाबतचा निकाल न्यायालयाने राखीव ठेवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com