Goa Monsoon Update: पावसाची उसंत, मात्र धोका कायम
Goa Monsoon Update

Goa Monsoon Update: पावसाची उसंत, मात्र धोका कायम

पणजी : गेले तीन दिवस आकाश ढगांनी झाकोळले होते, त्यामुळे गोमंतकीयांना सूर्यदर्शन होत नव्हते. गुरुवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मात्र सूर्यदर्शन झाले. एकंदर, हवामान अंदाजालाच पावसाने हुलकावणी दिली. वेधशाळेने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. आज शुक्रवारीदेखील  राज्यात केसरी अलर्ट कायम असून वेंगुर्ला ते वास्कोदरम्यानच्या किनारपट्टीवर वादळी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता हवामान वेधशाळेने वर्तवली आहे.(Goa Monsoon Update 40 to 55 kmph in Goa on today The winds are likely to blow faster)

तीन दिवस राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरुवारीदेखील अतिवृष्टीचा इशारा होता. अचानक पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. दुपारनंतर तर गोमंतकीयांना सूर्यदर्शनही झाले.

पावसाची उसंत, धोका कायम
आज शुक्रवारी प्रतितास 40 ते 55 कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाने गुरुवारी उसंत दिल्याने तिसऱ्या दिवशी सर्वत्र गर्दी दिसून आली. मात्र धोका अद्याप टळला नसल्याचे मत हवामान वेधशाळेचे एम.राहुल यांनी व्यक्त केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com