Goa Monsoon Update: डिचोलीत पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत

Goa Monsson Update
Goa Monsson Update

डिचोली: Goa Monsoon Update: मॉन्सून(Monsoon) सक्रिय झाल्यानंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. काल (रविवारी) दिवसभर डिचोलीत जोरदार पर्जन्यवृष्टी होताना पावसाने बहूतेक भागात झोडपून काढले. त्यातच बुधवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान(Weather) खात्याने वर्तविल्याने  पुढील दोन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 

कालच्या पावसात एका घरासह चारठिकाणी झाडांची पडझड झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. कालपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला असला, तरी दुसऱ्याबाजूने पाऊस सक्रिय झाल्याने बळीराजा आता मोठ्या उत्साहाने शेतीकामाकडे वळल्याचे दिसून येत आहे.

मोसमी पावसाने दोन दिवस दमदारपणे हजेरी लावल्यानंतर कालपासून पावसाने जोरदारपणे हजेरी लावली आहे. काल दुपारी काही वेळ सोडल्यास सकाळपासूनच  पावसाची संततधार चालू होती. सायंकाळी पाऊस किंचितसा ओसरला, तरी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप चालू होती. दिवसभर काल आणि काल दोन दिवस पावसाने झोडपून काढल्यामुळे रस्ते पाण्याखाली आले. रस्त्याच्या बाजूने तसेच सखल भागात पाणी साचून राहिल्याने बहूतेक ठिकाणी जलमय चित्र दिसून येत आहे. जोरदार पावसामुळे जनजीवनही पूर्णतया विस्कळीत झाले आहे. पावसामुळे हवामानातही गारवा निर्माण झाला आहे.

जोरदार पावसामुळे रविवारी सायंकाळी बोर्डे येथे प्रसाद पेडणेकर यांच्या घरावर निरफणसाचे झाड कोसळले. अन्य घटनेत   कुडचिरे येथे रस्त्यावर भलामोठा वटवृक्ष आडवा झाला. साखळी-विर्डी रस्त्यावर तसेच अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातही झाड कोसळले. झाडांच्या पडझडीत आर्थिक हानी वगळता विपरीत घटना घडलेली नाही. अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com