Goa Monsoon Update
Goa Monsoon Update

Goa Monsoon Update: पावसाची उसंत, मात्र समुद्राला उधाण

पणजी: ऑरेंज अलर्ट(orange alert) असतानाही राज्यात(Goa) दिवसभर पावसाने उसंत घेतली. मात्र वादळी वारे वाहू लागल्यामुळे समुद्र खवळला. आज शनिवारीदेखील अशीच स्थिती कायम राहणार असल्याचे हवामान वेधशाळेने म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यात ‘यलो अलर्ट’ ही कायम राहणार आहे. (Goa Monsoon Update The sea becomes Stirred as the wind blew)

सोमवारपासून राज्यात सलग दोन दिवस ‘रेड अलर्ट’ आहे. काल शुक्रवारी  मात्र पावसाने उसंत घेतली. वाळपई, म्हापसा, सत्तरी, पेडणे या परिसरात मात्र पावसाचा जोर कायम होता. समुद्र खवळलेला होता. त्यामुळे किनारपट्टी भागात सुमारे पाच ते सहा मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. बांबोळी येथे सायंकाळी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. इंडियन नॅशनल फॉर ओशन इनफॉर्मेशन सर्व्हिसेसने वेंगुर्ला ते वास्कोपर्यंतच्या गोवा किनारपट्टीवर काल 3.5 ते 4.8 मीटर उंच लाटांचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे सांगण्यात आले आहे.

डिचोलीत झाडांची पडझड चालूच

पावसाच्या तडाख्याबरोबर मागील चार-पाच दिवसांपासून डिचोलीत विविध भागात झाडांची पडझड चालूच आहे. शुक्रवारीही दिवसभरात अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रात दोन घरे आणि एका स्वच्छतागृहावर झाडे कोसळली. चोडण येथे श्री विष्णू मंदिरानजीक एका घरावर सागवानचे झाड, तर हरवळे येथे अन्य एका घरावर फणसाचे झाड कोसळले. त्यामुळे दोन्ही घरांची पडझड झाली. तर खरपाल येथील गोवा गेटीजवळील एका घराच्या स्वच्छतागृहावर वटवृक्षाची भलीमोठी फांदी कोसळून स्वच्छतागृहाची मोडतोड झाली. या पडझडीत 50 हजारांहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या घटनांची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी मदतकार्य हाती घेऊन झाडे हटवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com