Goa Monsoon Update: परतीचा पाऊसही जोरदार बरसणार?

दोन वर्षे माजवला हाहाकार, यंदा प्रमाणात घट, मात्र परिस्थिती बिकट,यंदा मान्सूनच्या (Monsoon) सरासरीत केवळ सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी दोन वर्षे अनुक्रमे 41 आणि 33 टक्क्यांची वाढ होती. पण यंदाच्या पावसाने (Rain) राज्याला जणू रडविले.
Goa Monsoon Update: परतीचा पाऊसही जोरदार बरसणार?
यंदाही परतीचा पाऊस (Rain) जोरदार पडेल, असे तज्‍ज्ञांचे म्हणणे आहे.Dainik Gomantak

पणजी: गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मान्सूनच्या (Monsoon) प्रमाणात प्रचंड घट झाली. अर्थातच, घट झाली असतानाही राज्यातील स्थिती मात्र बिकट झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. त्‍यात गेली दोन वर्षे परतीच्या पावसानेही (Rain) राज्यात हाहाकार माजविला होता, यंदाही परतीचा पाऊस जोरदार पडेल, असे तज्‍ज्ञांचे म्हणणे आहे.

 यंदाही परतीचा पाऊस (Rain) जोरदार पडेल, असे तज्‍ज्ञांचे म्हणणे आहे.
Goa Monsoon Updates: ‘गुलाब’ गेले आता ‘शाहीन’ची चाहूल

यंदा मान्सूनच्या सरासरीत केवळ सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी दोन वर्षे अनुक्रमे 41 आणि 33 टक्क्यांची वाढ होती. पण यंदाच्या पावसाने राज्याला जणू रडविले. बार्देश, डिचोली, सत्तरी, धारबांदोडा, काणकोण या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीने अनेक कुटुंबे बेघर झाली. सुमारे एक हजारहून अधिक घरे या काळात जमीनदोस्त झाली. जुलै महिन्‍यात झालेल्या मुसळधार पावसात राज्यातील सुमारे 832 हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन नुकसान झाले. एकूण तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद या काळात राज्यात झाली.

 यंदाही परतीचा पाऊस (Rain) जोरदार पडेल, असे तज्‍ज्ञांचे म्हणणे आहे.
Goa Monsoon Updates: जोर वाढलेलाच; सरासरीत 5 टक्के वाढ

गतवर्षी राज्यात सर्वाधिक 165.5 इंच पाऊस झाला, तर 2019 मध्ये 155.2 इंच पावसाची नोंद झाली होती. पण, दोन्ही वर्षी राज्याला इतका फटका बसला नव्हता. यंदा मात्र पावसाने कहरच केला. सध्या पावसाने दिलासा दिला असला, तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पहिल्‍याच दिवशी 45 टक्‍क्‍यांची घट

राज्यात परतीचा पाऊसही तुफान बरसेल, असा अंदाज हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे. परंतु, पोस्ट मान्सूनच्या पहिल्याच दिवशी नोंदीत चक्क 45 टक्क्यांची घट आहे. गेल्यावर्षी परतीचा पाऊस 9.1 इंच झाला होता. 2019 मध्ये 21.8, तर 2018 मध्ये 4.6 इंच झाला होता. परतीच्या पावसाची राज्यातील किमान सरासरी 7.9 इंच इतकी आहे.

Related Stories

No stories found.