Goa Monsoon Updates: 11 सप्टेंबरपर्यंत जोरदार कोसळणार
Goa Monsoon UpdateDainik Gomantak

Goa Monsoon Updates: 11 सप्टेंबरपर्यंत जोरदार कोसळणार

फोंड्यात (Ponda) सर्वाधिक म्हणजे 78.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली

पणजी: अरबी समुद्राच्या (Arabian Sea) उत्तरी भागात आणि बंगालच्या उपसागरात आंध्र आणि ओरिसाच्या (Odisa)किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात आजही मुसळधार पावसाची (Goa Monsoon Updates) शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने (IMD Goa) व्यक्त केली आहे. हा पाऊस 11 सप्टेंबरपर्यंत कोसळणार असल्याने गोमंतकीयांची ‘चवथ’ पावसातच होणार हे स्पष्ट आहे. मंगळवारी फोंड्यात (Ponda) सर्वाधिक म्हणजे 78.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Goa Monsoon Update
Goa Monsoon Updates: गोवेकरांना सतर्कतेचा इशारा

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातल्या वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असून तो वाढण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Goa Monsoon Update
Goa: मानवी कोंडीची मांडणी

गेल्या 24 तासात सरासरी 47.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस फोंडा येथे 78.5 मिलिमीटर झाला. पणजीत 68.8, जुने गोवेत 61.2 मि. मी. आणि दाभोळ येथे 63.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेडण्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 3 हजार 532 मिलिमीटर झाली. त्याच्या खालोखाल वाळपई आणि केपे परिसरातही सरासरी 3 हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

काणकोणात पावसाचा जोर कायम

काणकोणात पावसाचा जोर कायम असून गेल्या दोन दिवसांत 6.73 इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोणात आजपर्यंत 123.56 इंच पावसाची नोंद झाली आहे. 5 सप्टेंबर पर्यंत काणकोणात 116.83 इंच पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत काणकोणात 1.36 इंच पाऊस झाला. चापोली धरण जलाशयात 1123.29 हेक्टोमीटर म्हणजेच 38.76 मीटर पाणी साठा तयार झाल्‍याची माहिती जलस्त्रोत खात्याच्या अभियंत्या कल्पना गावकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com