Goa Monsoon Updates: यावर्षी वेळेपूर्वीच होणार मॉन्‍सूनचे आगमन

हवामान खाते: केरळमध्ये 27 मे रोजी धडकण्याची शक्यता
Goa Monsoon Updates: यावर्षी वेळेपूर्वीच होणार मॉन्‍सूनचे आगमन
Goa Monsoon UpdatesDainik Gomantak

पणजी: गोव्‍यात यंदा मॉन्‍सूनचे लवकर आगमन होऊ शकते, अशी माहिती भारतीय हवामान खात्‍याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केरळमध्ये यंदा मॉन्‍सून 27 मे रोजी दाखल होण्याची शक्‍यता आहे. केरळमध्ये पाऊस दाखल झाल्‍यानंतर अंदाजे 7 दिवसांनी गोव्‍यात मॉन्‍सून दाखल होतो. या पार्श्‍वभूमीवर राज्यात यावर्षी मॉन्‍सून दि. 2 जून रोजी दाखल होऊ शकतो, असेही वेधशाळेने म्‍हटले आहे.

हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (ता. १२) दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्यासाठी हवामान पोषक झाले आहे. त्यामुळे रविवारपर्यंत (ता. 15) दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी (ता. 13 ) हवामानशास्त्र विभागाने केरळमध्ये मॉन्‍सूनच्या आगमनाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा मॉन्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकतो. सांख्यिकीय मॉडेलच्या माध्यमातून हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. साधरणपणे मॉन्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षी तीन दिवस उशिरा मॉन्‍सून केरळमध्ये दाखल झाले होते. तर यंदा पाच दिवस आधी मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे.

Goa Monsoon Updates
Goa Panchayat Election: ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकीला विलंब

मंगळवारी मध्यम पावसाची शक्यता: पणजीसह राज्‍यातील काही भागात सकाळी आणि दुपारी पावसाने शिडकाव केला. आज शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. आज राज्‍यात 32 अंश सेल्‍सियस तापमानाची नोंद झाली. शनिवारी तापमानात थोडीशी वाढ होऊन ते 33 अंश सेल्‍सियस इतके राहील. पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहील. दि.17 रोजी काही ठिकाणी मध्यम व तुरळक पाऊस पडेल अशी माहिती वेधशाळेने दिली.

Goa Monsoon Updates
साखळी येथील ‘अमर लता’ कार्यक्रमाची वाखाणणी

मॉन्सूनची वर्दी

वर्ष आगमन

2017 30 मे

2018 29मे

2019 8 जून

2020 1 जून

2021 3 जून

99 टक्के पाऊस

14 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) 99 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.