Mopa Airport: मोपा विमानतळाच्या नावाचा वाद पुन्हा सुरु; वाळपईत धरणे आंदोलन

Mopa Airport: पेडणे नामकरण समितीची मागणी ; पेडणेतील अनेक भूमिपुत्रांच्या जमिनी मोपासाठी गेल्या
Mopa International Airport
Mopa International Airport Dainik Gomantak

Mopa Airport: संपूर्ण गोव्यात मोपा विमानतळाच्या नामकरणाचा वाद सुरू आहे. प्रत्येकजण आपल्या मागणीसाठी आवाज उठवत आहेत. वाळपईत काल धरणे आंदोलन करण्यात आले तर डिचोलीतही आज धरणे आंदोलन होणार आहे.

भाऊसाहेब बांदोडकरांनी सत्तरीत प्राथमिक शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण काम केले होते. पेडणेतील अनेक भूमिपुत्रांच्या जमिनी मोपासाठी गेलेल्या आहेत. भाऊसाहेब हे पेडण्यातील असल्याने तिथे मोपाचे लोकार्पण होते, हे सर्वांसाठी चांगलेच आहे. म्हणूनच सरकारने मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाऊसाहेबांचेच नाव द्यावे, अशी जोरदार मागणी आज मंगळवारी सायंकाळी करण्यात आली.

वाळपई जुन्या पालिका कार्यालयासमोर धरणे कार्यक्रम पेडणे नामकरण समितीतर्फे करण्यात आला होता. त्यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रही मागणी केली आहे. निमंत्रक सुभाष केरकर, समित परवार, रामदास मोर्जे, आयुष केरकर, अजित फातर्पेकर, विशाखा परवार, माली परवार, मेनन खांडेपारकर आदींची उपस्थिती होती.

समित परवार म्हणाले, गेली चार वर्षे वरील मागणी आम्ही करीत आहोत. गोव्याचे भाग्यविधाते म्हणून भाऊसाहेबांना मान दिला पाहिजे. धरणे कार्यक्रम करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. सरकारने आता त्वरित निर्णय घ्यावा.

मोपा विमानतळाचे फलक राष्ट्रीय महामार्गावर झळकले

मोपा विमानतळ प्रकल्पाला कुणाचे नाव द्यावे यासाठी राज्यभर उलट सुलट चर्चा सुरू असतानाच जीएमआर कंपनीने ‘न्यू गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा’ असे नामकरण करून राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी फलक लावले आहेत.

मोपा विमानतळ प्रकल्पाला प्रमुख नेत्यांची नावे द्यावीत, अशी वेगवेगळ्या माध्यमातून जोरदार मागणी होत आहे. राज्य सरकारने भाऊसाहेब बांदोडकर व मनोहर पर्रीकर या दोन नावांची शिफारस करणारे पत्र केंद्र सरकारला पाठविल्याचेही जाहीर केले आहे, तर दुसऱ्या बाजूने मोपा विमानतळ नामकरण समितीअंतर्गत ठिकठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे.

Mopa International Airport
Pankaj Tripathi IFFI 2022: वाजपेयींची भूमिका मिळाली हे माझे भाग्यच!

मोपाप्रकरणी आज डिचोलीत धरणे

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला बहुजनभूषण कै. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्यात यावे. या प्रस्तावित मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती गोवातर्फे बुधवार, 23 रोजी डिचोलीत धरणे कार्यक्रम आयोजिला आहे.

येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी 4 ते 5.30 वाजेपर्यंत हे धरणे धरण्यात येणार आहे, असे आवाहन निमंत्रक सुभाष केरकर यांनी केले आहे.

"राज्यभर धरणे कार्यक्रम होणार आहेत. लोकांनीही भाऊसाहेबांचेच नाव विमानतळास द्यावे ही मागणी उचलून धरली आहे. मोपासाठी लाखो चौरस मीटर जागा भूमिपुत्रांची गेलेली आहे. जर भाऊसाहेबांचे नाव दिले नाही तर पेडणेवासीयांचा तो अपमान ठरणार आहे. 4 डिसेंबर रोजी म्हापशात मोठी जाहीर सभा होणार आहे. त्यात मागणी लावून धरून ठराव घेतला जाणार आहे."

- सुभाष केरकर, निमंत्रक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com