गोव्यातील मोप विमानतळ ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू होणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

गोव्यातील मोप ग्रीनफील्ड विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विमानतळ ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

पणजी :  गोव्यातील मोप ग्रीनफील्ड विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विमानतळ ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितलं होतं.कोश्यारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत करण्यात आलेल्या अभिभाषणात ते म्हणाले, “मोप विमानतळ प्रकल्पाचे बांधकाम जोरात सुरू आहे आणि ऑगस्ट 2022 मध्ये ते पूर्ण होऊन कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे.” केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोप विमानतळाच्या द्रुतगती मार्गापासून राष्ट्रीय महामार्ग-66 ला जोडणाऱ्या एक्स्प्रेसवेला मान्यता दिली आहे असल्याचेही कोश्यारी यांनी सांगितले. तसेच, मुख्यंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीदेखील आज विधासभेत याबद्दल माहिती दिली.

गोव्यातील 'गांजा लागवडी'ला पूर्णविराम

उत्तर गोव्यातील मोप पठारानजीक असलेल्या विमानतळाचा पहिला टप्पा 3 सप्टेंबर 2020 पर्यंत सुरू होणार होता, परंतु कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या पर्यावरणीय खटल्यांमुळे उशीर झाला. ज्यात विमानतळाच्या बांधकामासाठी बेकायदा झाडे तोडल्याचा आरोप केला होता. जीएमआर विमानतळ आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने विमानतळ तयार करण्यात येत आहे.

आम आदमी पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

पहिल्या टप्प्यात विमानतळावर 4.5  दशलक्ष प्रवासी प्रवास करू शकतील तर, चौथा टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रवासी क्षमता 14 दशलक्ष होणार आहे. मध्यंतरी काम बंद पडल्यामुळे मुदतवाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली होती, त्याला आता मंजुरी मिळाली असून काम पूर्ण करण्यात आणखी नव्वद दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. सध्या गोव्यात दाबोळी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तो नौदलाच्या ताब्यात असल्याने नागरी हवाई वाहतुकीवर मर्यादा आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर वरचे स्थान असलेल्या गोव्याला स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे.

 

 

संबंधित बातम्या