Mormugao News: 'श्रीकृष्ण ओअर कॅरियर्स' संबंधी खंडपीठाकडून गंभीर दखल; जिल्हाधिकाऱ्यांना दिले 'हे' आदेश

खंडपीठाचा आदेश : मृत कामगाराच्या कुटुंबास भरपाई देण्यास टाळाटाळ
Court
Court Dainik Gomantak

Mormugao News श्रीकृष्ण ओअर कॅरियर्स कंपनीत कामावर असताना अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना देय असलेली रक्कम गेल्या आठ वर्षांपासून देण्यास टाळाटाळ केल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेतली.

या कंपनीच्या संचालकांच्या मुरगाव तालुक्यातील दोन सदनिका 48 तासांत सील करण्याचे निर्देश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना देत कंपनीला दणका दिला.

दीपाली ऊर्फ सुधा गोवेकर आणि इतर तिघांनी श्रीकृष्ण ओअर करियर्स व इतर आठ जणांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर करून या कंपनीत कामाला असताना मृत्यू झालेल्या कामगाराची देय असलेली मूळ रक्कम व्याजासह देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती.

या कामगाराचा कंपनीतील अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना त्याने केलेल्या सेवेतील देय असलेली रक्कम कंपनीने देण्यास अनेक वर्षे टाळाटाळ केली.

Court
Goa Monsoon 2023: ब्रेकनंतर राज्यात पुन्हा सक्रीय होणार मॉन्सून; 7 ते 12 सप्टेंबरपर्यंत बरसणार

2015 साली ही रक्कम 3 लाख 19 हजार 600 रुपये होती. आताच्या घडीस ही रक्कम व्याजासह 10 लाख 48 हजार रुपये झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी कंपनीचे रिशीचंद्र नायर उपस्थित होते.

ही रक्कम देण्यासंदर्भात कंपनीकडून कोणताच प्रस्ताव दिला जात नसल्याबद्दल खंडपीठाने त्यांची कानउघाडणी करत ते सध्या राहात असलेली सदनिका आणि त्यांची आणखी एक सदनिका सील करत या दोन्ही सदनिकेशी कंपनीच्या संचालकांना कोणताही व्यवहार न करण्याचे निर्देश दिले आहेत.

जर सदनिकांना खरेदीदार मिळत असल्यास न्यायालयाला त्याची माहिती देण्यास मुभा देण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.

Court
Rumdamol Murder Case: बेळ्‍ळारी खून : आणखी दोघांना अटक तर अजूनही एक संशयित फरार

...अखेर दिली लेखी हमी

या याचिकेवरील सुनावणीस उपस्थित असलेले रिशीचंद्र नायर यांनी एका आठवड्यात तीन लाख रुपये उच्च न्यायालयात जमा केले जातील, असे सांगितले. ती लेखी हमी म्हणून स्वीकारली आहे. ही रक्कम 13 सप्टेंबरपर्यंत जमा करावी.

या सदनिकांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय नायर यांनी दिलेल्या या हमीमुळे पुढे ढकलत आहोत. मात्र, ही रक्कम जमा न केल्यास सदनिका विक्रीचा आदेश दिला जाईल. याप्रकरणी पुढील सुनावणी 13 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com