Goa: मुरगाव भाजपतर्फे तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन (Goa)
Goa: मुरगाव भाजपतर्फे तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन
Mormugoa BJP organizes Tiranga cycle rally (Goa)Dainik Gomantak

मुरगाव मतदार संघात (Mormugoa Constituency) भाजपतर्फे (BJP) तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन (Organised Tiranga Cycle Rally) स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आले होते (Independence Day). मुरगाव भाजपा गटाध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी या रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना गटाध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी मुरगाव मतदारसंघात मंत्री मिलिंद नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुरगावचा चौफेर विकास चालू असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (India PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली भारत देशात विकासाची गंगा वाहत आहे असे ते म्हणाले. तिरंगा रॅलीचा शुभारंभ करुन त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. (Goa)

Mormugoa BJP organizes Tiranga cycle rally (Goa)
Goa KTC: पेडणे कदंबा वाहतूक कर्मचारी संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांचा सत्कार

सदर तिरंगा सायकल रॅलीला मंत्री मिलिंद नाईक यांच्या बोगदा येथील शासकीय निवासापासून सुरुवात करण्यात आली. नंतर ती जेटी, हेडलँड सडा, रूमडावाडा, बायणा व शेवटी बायना समुद्रकिनाऱ्यावर सांगता झाली. नंतर या सायकल रॅलीत सहभागी झालेल्यांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली. यावेळी गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, नगरसेविका कुणाली पार्सेकर, नगरसेवक रामचंद्र कामत, दामोदर नाईक, लिओ रॉड्रिगीस तसेच मुरगाव भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सोमनाथ बांदेकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रॅलीत सहभागीना प्रशस्तिपत्रके देण्यात आली. एकूण ६० जणांनी या सायकल रॅलीत भाग घेतला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com