Goa:गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षी त्यांच्या घरात प्रकाश

कोणी-मोरपिर्ला येथील तीन घरांना सौरऊर्जा
Goa:गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षी त्यांच्या घरात प्रकाश
Goa Morpirla Solar LightDainik Gomantak

केपे : गोवा राज्य (Goa State) मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असून या साठ वर्षांच्या कार्यकाळात राज्यात अजूनही काही ठिकाणी वीज (Light) पोहचू शकलेली नाही. मात्र, आता या घरांना सोलर (Solar) वीज (Light) देऊन त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. याचा फायदा केपे तालुक्यातील मोरपिर्ला पंचायत क्षेत्रातील कोणी गावातील दहा कुटुंबांपैकी तीन घरांना झाला असून उर्वरित सात घरांनाही सोलर वीजजोडणी दिली जाणार आहे. मोरपिर्ला हा गाव केपे तालुक्यात ग्रामीण भागात असून काही घरे डोंगराळ भागात असल्याने तेथे वीज नेणे जिकिरीचे आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे येथील लोकांना विजेची सुविधा मिळालेली नाही. मोरपिर्ला पंचायत मंडळाने कोणी या गावासाठी सोलर वीजजोडणी द्यावी म्हणून गोवा ऊर्जा विकास मंडळाकडे लिखित मागणी केली होती असे सरपंच नीलेश वेळीप यांनी सांगितले.

Goa Morpirla Solar Light
Goa: मालपे गोवा दरबार बनला भूत बंगला

पंचायत मंडळाच्या मागणीनुसार गोवा (Goa) ऊर्जा विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सात महिन्यांपूर्वी येऊन या घरांची पाहणी केली होती. बुधवारी दहा कुटुंबांपैकी तीन घरांना सोलर वीज जोडणी देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय केल्याचे वेळीप यांनी सांगितले. (Goa Electricity) ही घरे डोंगराळ भागात आहेत. या गावात सोलर वीजपुरवठा करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन जाण्यासाठी बराच त्रास होत असल्याने सध्या तीनच घरांना सोलर पॅनल बसवून वीज दिली असून उर्वरित घरांनाही लगेच वीज देण्यात येणार असल्याचे सरपंच वेळीप यांनी सांगितले. डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांसाठी सरकारने हा चांगला उपक्रम राबविला असून याचा लोकांनी फायदा करून घेतला पाहिजे, असे वेळीप (Nilesh Velip) यांनी सांगितले.

Goa Morpirla Solar Light
Goa: काणकोणमधील उद्यानाला आली अवकळा

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com