गोव्याचा मोटारसायकल पायलट व्यवसाय धोक्यात

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

देशातील हा एकमेव व विश्‍वासू असा 'मोटारसायकल पायलट' पारंपरिक व्यवसायही धोक्यात आला असून, बहुजन समाजावर हा अन्याय होत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.

पणजी : राज्यात बेकायेदशीरपणे ‘उबेर मोटो’ या ॲपद्वारे मोटारसायकल पायलट सेवा सुरू असूनही वाहतूक खात्याकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. देशातील हा एकमेव व विश्‍वासू असा 'मोटारसायकल पायलट' पारंपरिक व्यवसायही धोक्यात आला असून, बहुजन समाजावर हा अन्याय होत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.

या ‘ॲप’ला असलेल्या राजकिय वरदहस्तामुळेच बिनधास्तपणे ही बेकायदेशीर सेवा सुरू असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी केला. सध्या कोरोना महामारीमुळे संबधित व्यावसायातील कुटुंबियांना हालाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. पायलट व्यवसाय हा बहुजन समाजातील मध्यमवर्गीय कुटूंबियांना जगण्याचे साधन असून, या कोविड महामारीमुळे गेल्या काही महिन्यांपासून पालयटच्या मागे बसायलाच लोक कचरतात.

या कारणाने त्यांना काम मिळत नसल्याने पायलटच्या कुटुंबाची हेळसांड होत आहे. यावर काही उपाययोजना काढण्यासाठी पायलट बांधवांकडून विविध मागण्या केल्या जात आहेत.  

 

 

 

 

संबंधित बातम्या