Goa Muncipal Election 2021: आतापर्यंत 48.75 टक्के मतदानाची नोंद

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण तसेच मृत्युचे प्रमाण वाढत असताना आज राज्यातील पाच पालिकांसाठी कोरोनाच्या सावटाखाली मतदान सुरू आहे.

पणजीः राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण तसेच मृत्युचे प्रमाण वाढत असताना आज राज्यातील पाच पालिकांसाठी कोरोनाच्या सावटाखाली मतदान सुरू आहे. म्हापसा, सांगे, मडगाव, मुरगाव व केपे या पाच पालिकांमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी 48.75 टक्के मतदानाची नोंद झाली होती. आज सकाळी मतदानासाठी मतदान केंद्रावर लोकांच्या रांगा नव्हत्या मात्र दहा वाजल्यानंतर हळूहळू मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढू लागली. कोरोनाचा संसर्ग असूनही अनेक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घाबरत घराबाहेर पडले. (Goa Muncipal Election 2021 has recorded 48.75 per cent turnout so far)

गोव्यात संचारबंदीच्या नियमांचा उडाला फज्जा; हरमल भागात हॉटस्पॉट जाहीर

संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असली तरी 4 ते 5 वाजेपर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष वेळ ठेवण्यात आली आहे. दुपारपर्यंत राज्यात कोठे कोणताच अनुचित प्रकार घडलेला नाही.पालिका निवडणूक सुरू असलेल्या क्षेत्रात निवडणूक अधिकाऱ्यांची भरारी पथके तसेच पोलिसांची गस्त ठेवण्यात आली असल्याने कोणतेही अनुचित घटना नोंद झालेली नाही. मडगाव पालिकेत 18 ठिकाणे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले असून तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तयार ठेवण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या