Goa Municipal corporation election Result 2021: नावेली मतदारसंघातून एडविन कार्दोझ आघाडीवर

Goa Municipal corporation election Result 2021 BJP leads in Pedne municipal elections
Goa Municipal corporation election Result 2021 BJP leads in Pedne municipal elections

पणजी: राज्यातील सहा पालिका, एका महापालिकेसाठी निवडणूक तसेच साखळी पालिकेचा एक प्रभाग, नावेली जिल्हा पंचायत व 18 पंचायत प्रभागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान मोठ्या संख्येने झाले आहे. त्यामुळे या अटीतटीच्या लढतींमध्ये मतदारांनी कोणाला कौल दिला, त्याची मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर सुरू होणार आहे. मतांमध्ये वाढ झाल्याने कोणी बाजी मारली, हे मतपेटीमध्ये सील असल्याने मतमोजणीनंतर त्याचा पर्दाफाश होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही सेमिफायनल म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळेच या निकालाकडे सत्ताधारी तसेच विरोधकांचेही लक्ष लागले आहे. 

124 प्रभागांमधून 423 उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी केलेल्या मतदानातून उघड होणार आहे. सहा पालिका व महापालिकेसाठी ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहेत. पेडणेमध्ये 91. 02 टक्के मतदान झाल्याने पेडण्याचे आमदार तथा मंत्री बाबू आजगावकर यांचे या पालिकेवर किती वर्चस्व आहे, हे सिद्ध होणार आहे. 

एडविन कार्दोझ आघाडीवर

मडगाव ः दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार एडविन (सिप्रू) कार्दोझ आघाडीवर आहेत. काॅंग्रेसच्या अॅंड. प्रतिमा कुतिन्हो दुसऱ्या स्थानावर आहेत. आम आदमी पार्टीच्या माटिल्डा डिसिल्वा व भाजपचे सत्यविजय नाईक हे उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. कार्दोझ हे या मतदारसंघातून यापूर्वी सलग सलग दोनवेळा निवडून आले आहेत.  

पेडणे नगरपालिका निवडणूकीत एकूण दहा प्रभापैकी सहा भाजप पुरसकृत गटाचे उमेदवार निवडून आले.तर पाच अपक्ष उमेदवार निवडून आले .

भाजप पुरसकृत  विजयी उमेदवार. प्रभाग :- 3)- राखी कशालकर ,प्रभाग 4)उषा नागवेकर ,6) तृप्ती सावळ देसाई प्रभाग 8) माधव देसाई ,प्रभाग 9) सिध्देश पेडणेकर ,प्रभाग 10)विष्णू साळगावकर.

सगळ्यांचे लक्ष राहुन गेलेल्या प्रभाग 7 मधुन भाजप पुरस्कृत उमेदवार वासुदेव देशप्रभु यांचा पराभव झाला .

अपक्ष उमेदवार 

प्रभाग 1 मनोज हरमलकर प्रभाग  :- 2)अश्विनी पालयेकर

प्रभाग:- 5 विशाखा गडेकर .प्रभाग :- 7 )शिवराम तुकोजी.

पणजी महापालिका

विद्यमान नगरसेवकापैकी  किशोर शास्री प्रभाग 6, राहुल लोटलीकर प्रभाग 8 सोरैया मखिजा पिंटो प्रभाग 9 शेखर डेगवेकर प्रभाग 23 हे भाजप समर्थक पॅनलचे उमेदवार पराभूत. प्रभाग 29 मधून नगरसेवक रुपेश हळर्णकर (अपक्ष ) पराभूत. प्रभाग 23 मधे संतोष (बन्सी )  सुर्लिकर  हे  अपक्ष उमेदवार ठरले जायट किलर. दोन वेळा निवडून आलेले शेखर डेगवेकर यांचा  त्यांनी पराभव केला.

पणजीकर पॅनलचे निमंत्रक  सुरेंद्र फुर्तादो व पत्नी रुथ फुर्तादो विजयी

पणजी महापालिका 30 पैकी 25 जागा भाजप व आमदार बाबूश मोन्सेरात यांचा पाठिंबा लाभलेल्या टुगेदर फॉर अ प्रोग्रेसिव्ह पणजी पॅनलला. 4 जागा सर्वपक्षीय आम्ही पणजीकर पॅनलला 1 अपक्षाला आम्ही पणजीकर पॅनलचे निमंत्रक  सुरेंद्र फुर्तादो व पत्नी रुथ फुर्तादो विजयी.

कुंकळ्ळी पालिकेवर युरी आलेमाव यांचे वर्चस्व

मडगाव ः कुंकळ्ळी पालिका निवडणुकीत भाजपचे आमदार क्लाफास डायस यांना झटका बसला आहे. माजी नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांचे पूत्र व  काॅंग्रेसचे युवा नेते युरी आलेमाव समर्थक पॅनलने कुंकळ्ळी पालिकेवर वर्चस्व मिळवले असून कुंकळ्ळीच्या 14 पैकी 9 प्रभागांमध्ये या पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत

पणजी महापालिका प्रभाग 15 मधून शयनी शरद चोपडेकर आघाडीवर

पणजी महापालिका प्रभाग 16 मधून अस्मिता संदेश केरकर आघाडीवर

पणजी महापालिका प्रभाग 13 मधून प्रमय प्रकाश माईणकर आघाडीवर

पणजी महापालिका प्रभाग 14 मधून उदय वामन मडकईकर आघाडीवर

पणजी महापालिका प्रभाग 9 रूथ सुरेंद्र फुर्तादो आघाडीवर


विशाल शाबू देसाई विजयी 

मडगाव कुंकळ्ळी पालिकेच्या प्रभाग 11 मधून भाजप समर्थक पॅनलचे विशाल शाबू देसाई निवडून आले आहेत. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड व स्थानिक नेत्यांना दिले आहे. पालिका अध्यक्षपद निवडीच्या प्रक्रियेत पक्षाच्या सूचनेनुसार सहभागी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.  

लॅंड्री मास्कारेन्हसची हॅट्रीक

मडगाव ः कुंकळ्ळी पालिकेच्या प्रभाग 12 मधून लॅंड्री मास्कारेन्हस निवडून आले असून पालिका निवडणुकीत सतत तिसऱ्यांदा विजयी होऊन त्यांनी विजयाची हॅट्रीक साधली आहे. आपण कॅंग्रेसचा कार्यकर्ता असून भाजप पॅनलला समर्थन देणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com