Goa Municipal corporation election Result 2021: नावेली झेडपी पोटनिवडणुकीत एडविन कार्दोझ यांचा विजयी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार एडविन (सिप्रू) कार्दोझ यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची हॅट्रिक साधली.     

मडगाव ःदक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार एडविन (सिप्रू) कार्दोझ यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची हॅट्रिक साधली.     

अटतटीच्या लढतीत कार्दोझ यांनी  काॅंग्रेससच्या उमेदवार अॅड प्रतिमा कुतिन्हो यांच्यावर 372 मतांनी मात केली. कार्दोझ यांना 2895 तर कुतिन्हो यांना 2523 मते मिळाली. तिसऱ्या स्थानावर आलेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार माटिल्डा डिसिल्वा यांनीही या निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केली. त्यांना 2428 मते मिळाली.

फोंड्यातील ढवळी मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये 

भाजपचे सत्यविजय नाईक यांना 994 मते मिळाली. कार्दोझ हे या मतदारसंघातून यापूर्वी सलग सलग दोनवेळा निवडून आले आहेत. कार्दोझ यांना माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी पाठिंबा दिला होता. 

Goa Municipal corporation election Result 2021: कारापूर-सर्वण पंचायत पोटनिवडणुकीत गोकुळदास सावंत विजयी, भाजप मंडळ तोंडघशी 

संबंधित बातम्या