Goa Municipal corporation election Result 2021: कारापूर-सर्वण पंचायत पोटनिवडणुकीत गोकुळदास सावंत विजयी, भाजप मंडळ तोंडघशी 

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

डिचोली तालुक्यातील कारापूर-सर्वण पंचायतीच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे गोकुळदास महादेव सावंत निवडून आले आहेत. कारापूर-सर्वण पंचायतीच्या प्रभाग-9  साठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

डिचोली: डिचोली तालुक्यातील कारापूर-सर्वण पंचायतीच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे गोकुळदास महादेव सावंत निवडून आले आहेत. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी आणि मये भाजप मंडळाचे सरचिटणीस  शशिकांत जगन्नाथ सावंत यांचा तब्बल 69 मतांनी पराभव केला. कारापूर-सर्वण पंचायतीच्या प्रभाग-9  साठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

Goa Municipal corporation election Result 2021: पेडणे नगरपालिका निवडणूकीत भाजपची आघाडी 

या प्रभागातून 91.05 टक्के मतदान झाले होते. एकूण 816 मतदारांपैकी 743 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विजयी उमेदवार गोकुळदास सावंत यांना 389 मते मिळाली. शशिकांत सावंत यांना 320 मते तर अन्य एक उमेदवार विठ्ठल पुरुषोत्तम सावंत यांना केवळ 26 मते पडली. या प्रभागाचे माजी पंच रमेश सावंत यांचे अकाली निधन झाल्याने या प्रभागासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

पिलियन रायडर्स बनताहेत वाटाड्या; गोव्याच्या वाहतूक पोलिसांची वाढलीये डोकेदुखी 

आज सोमवारी सकाळी डिचोलीतील सरकारी कार्यालय इमारत संकुलात निवडणूक अधिकारी तथा संयुक्त मामलेदार अक्षया आमोणकर यांच्या देखरेखीखाली आणि निरीक्षक चंद्रकांत शेटकर यांच्या निरीक्षणाखाली मतमोजणी पार पडली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार गोकुळदास सावंत यांच्यासह समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. या प्रभागातून निवडून आलेले गोकुळदास सावंत हे माजी पंच स्व. रमेश सावंत यांचे नात्याने पुतणे आहेत. 

फोंड्यातील ढवळी मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये 

संबंधित बातम्या