गोवा महापालिकेने आत्तापर्यंत मास्क न वापरणाऱ्यां ५४३ जणांवर केलेी कारवाई

Goa Municipal Corporation has taken action against 543 people who did not wear masks till
Goa Municipal Corporation has taken action against 543 people who did not wear masks till

पणजी: राज्यात येणारे पर्यटक मास्कचा वापर करीत नसल्याचे आढळून आले आहे. महापालिकेने मास्क न वापरणाऱ्यांवर ठिकठिकाणी दंडात्मक कारवाईला सुरवात केली आहे. आत्तापर्यंत महापालिकेने ५४३ जणांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

 
पणजी शहरात देश-विदेशातील पर्यटक सध्या भेट देत आहेत. त्यात देशातील विविध राज्यांतून आलेल्या पर्यटकांचा अधिक समावेश आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक ठिकाणी फिरताना पर्यटक मास्क वापरत नसल्याचे आढळून आल्याने महापालिकेने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत महापालिकेने ५४३ जणांवर दंडात्मक कारवाई केली असून, महापौर मडकईकर यांना या मोहिमेसाठी निरीक्षकांना व कर्मचाऱ्यांना घेऊन शहरभर फिरावे लागत आहेत. 


महापालिकेचे निरीक्षक हे कारवाई करण्यासाठी धजावत नसल्याने आपणास त्यांच्याबरोबर रस्त्यावर यावे लागत असल्याचे मडकईकर यांनी सांगितले. राज्य सरकारने दोनशे रुपये दंड सुरू केला असला तरी स्थानिक नागरिकही बिनधास्तपणे विना मास्क फिरताना दिसत आहेत. उद्या, शुक्रवारपासून शहरातील सर्व गर्दीच्या ठिकाणी अशाप्रकारची कारवाई करणार असल्याचे मडकईकर यांनी सांगितले.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com