Goa Municipal Election 2021: वाळपईत 42 टक्के एकूण मतदान

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

तरुणांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी उत्फुर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग दर्शविला आहे.

वाळपई: (Goa Municipal Election 2021 42 percentage turnout in Walpai ) वाळपई नगरपालिकेसाठी आज शविवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. 42 टक्के एकूण मतदान झाले आहे. सकाळ पासून तरुणांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी उत्फुर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग दर्शविला आहे. वाळपईत एकूण दहापैकी नऊ प्रभागात निवडणूक होते आहे. प्रभाग आठ मधून बिनविरोध नगरसेवक नियुक्त झाल्या आहेत.

Municipal Corporation Election 2021: कुंकळ्ळीत साडेअकरापर्यंत 27 टक्के मतदान

आज सकाळ पासूनच वाळपई भागात वाळपई बाजार, वेळूस, नाणूस, या परिसरातील मतदान केंद्रावर उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. नाणूस भागात प्रचंड प्रमाणात रस्त्याबाहेर वाहनांचा ताफा दिसून आला. त्यामुळे मतदार राजा यावेळी मोठ्या हिरीरीने सहभागी झालेला दिसला आहे. कोवीडमुळे सामाजिक अंतर राखून मतदान प्रक्रिया हाती घेतली आहे.

संबंधित बातम्या