Goa Municipal Election 2021: मडगाव पालिकेवर कामत - सरदेसाईंच्या युतीचा झेंडा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 एप्रिल 2021

गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या मडगाव नागरी युतीने मडगाव पालिकेवर आपला झेंडा फडकवला.

मडगाव: गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या मडगाव नागरी युतीने मडगाव पालिकेवर आपला झेंडा फडकवला. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालात या युतीचे 14 उमेदवार विजयी झाले आहेत. (Goa Municipal Election 2021 Kamat on Madgaon Municipality Sardesais alliance flag)

मडगाव पालिकेचे 25 प्रभाग असून आतापयर्ंत 20 प्रभागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलचे 8, कामत यांच्या माॅडेल मडगाव पॅनलचे 6, भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलचे 5  उमेदवार निवडून आले आहेत. कामत यांच्या विरुद्ध बंड करून प्रभाग 15 मधून निवडणूक लढवलेले महेश आमोणकर यांच्या रुपात एक स्वतंत्र उमेदवार निवडून आला आहे. 

Goa Municipal Election Result 2021: मडगाव नागरी युतीचे 10, तर वायब्रंट मडगावचे...

आतापर्यंत निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे 

फातोर्डा फाॅरवर्ड -  फ्रान्सिस जोन्स (प्रभाग 1), जाॅनी क्रास्टो (प्रभाग 2), लिंडन परेरा (प्रभाग 3) पूजा नाईक (प्रभाग 4), श्वेता लोटलीकर (प्रभाग 5), रविंद्र (राजू) नाईक (प्रभाग 9), वितोरीनो तावारीस (प्रभाग 10),  राजू  नाईक (प्रभाग 11)

माॅडेल मडगाव -  सगुण नाईक (12), दिपाली सावळ (16) , सीताराम गडेकर (17), घनश्याम प्रभू शिरोडकर (18), लता पेडणेकर (19), सॅंड्रा फर्नांडिस (20)

 वायब्रंट मडगाव - सदानंद नाईक ( 6), मिलाग्रीना गोम्स (7) व कामिलो बारेटो (8), सुशांता कुरतरकर (13), रोनिता राजेंद्र आजगावकर (14).

स्वतंत्र उमेदवार - महेश आमोणकर (प्रभाग 15)

अध्याप 5 प्रभागांतील मतमोजणी बाकी आहे, 

संबंधित बातम्या