गोवा पालिका निवडणुक: "यांना मंत्रिमंडळातून काढून टाका"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

पालिका निवडणुकीत  प्रभाग आरक्षणाचा  घोळ केल्याप्रकरणी नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे, असे मत वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा यांनी व्यक्त केले.

पणजी: पालिका निवडणुकीत  प्रभाग आरक्षणाचा  घोळ केल्याप्रकरणी नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे, असे मत वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, मी माझी यासंदर्भातील नाखुषी व्यक्त करणारे सविस्तर पत्र मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना पाठवले आहे, त्या पत्राची प्रत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनाही दिली आहे. दक्षिण गोव्याचे माजी खासदार ऍड नरेंद्र सावईकर यांना यासंदर्भात ईमेलने कळवले आहे.

कार्लोस म्हणाले, केवळ मुरगाव मध्येच नव्हे तर मडगाव आणि कुंकळ्ळीतहीभाजपचे कार्यकर्ते आणि नेते आरक्षणावरून नाखूष आहेत. नगरपालिका कायद्याच्या कलम 9 व 10 नुसार आरक्षण ठरवले गेले पाहिजे,मात्र आताच्या निवडणुकीवेळी त्याचे पालन झालेले दिसत नाही. पूर्वी आरक्षित असलेल्या प्रभागाच्या पुढील प्रभाग या खेपेला आरक्षित ठेवायचा असतो. हा  निकष यावेळी पाळण्यात आलेला नाही. आपल्याला हवे तसे आरक्षण या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. मुरगाव पालिका क्षेत्रात महिलांसाठी आरक्षित प्रभावच नाहीत असे कसे होऊ शकते. आणखीन काही महिन्यांनी  मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघातील साखळी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यावेळीही आरक्षणाचा असाच घोळ घालणार आहेत का. 
ते म्हणाले, सध्या हा विषय न्यायप्रविष्ट आहे. पक्षाघाताच्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मला पुनर्जन्म मिळालेला आहे, त्यामुळे  निवडणूक मी नव्या स्फूर्तीने लढवणार आहे. आरक्षण कसेही असले तरी मला पालिका निवडणूक जिंकावीच लागेल. त्यामुळे समर्थकांची उमेदवार म्हणून येत्या दोन-तीन दिवसात मी निवड करेन. निवडणूक कशी होईल हे सारे काही उच्च न्यायालयाच्या निवाड्यावर  अवलंबून आहे मात्र या साऱ्याची जबाबदारी नगर विकास मंत्र्यांवरच येते.

यावर्षीच्या गोवा मुक्तिदिनापूर्वी गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याचा मानस -

संबंधित बातम्या