Goa Municipal Election Result 2021: मडगाव नागरी युतीचे 10, तर वायब्रंट मडगावचे 5 उमेदवार विजयी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 एप्रिल 2021

मडगाव नागरी युतीचे 10, भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलचे 5 व एक स्वतंत्र उमेदवार विजयी झाला आहे. 

मडगाव : मडगाव पालिकेच्या 25 पैकी 16 प्रभागांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले असून गोवा फाॅरवर्ड व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्य मडगाव नागरी युतीचे 10, भाजपच्या वायब्रंट मडगाव(Madgaon) पॅनलचे 5 व एक स्वतंत्र उमेदवार विजयी झाला आहे. 

चौथ्या टप्प्यातील मतमोजणीत हाती घेण्यात आलेल्या चारपैकी दोन प्रभागात भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलच्या सुशांता कुरतरकर (प्रभाग 13) व रोनिता राजेंद्र आजगावकर (प्रभाग 14), कामत यांच्या माॅडेल मडगाव पॅनलच्या दिपाली सावळ (16), व अपक्ष उमेदवार महेश आमोणकर (15) निवडून आले आहेत. (Goa Municipal Election Result 2021 10 candidates from Madgaon Civil Alliance and 5 candidates from Vibrant Madgaon won)

Goa Municipal Elections Result 2021 : मडगाव नागरी युतीचे 9, तर वायब्रंट मडगावचे...

आतापर्यंत निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे 

फातोर्डा फाॅरवर्ड -  फ्रान्सिस जोन्स (प्रभाग 1), जाॅनी क्रास्टो (प्रभाग 2), लिंडन परेरा (प्रभाग 3) पूजा नाईक (प्रभाग 4), श्वेता लोटलीकर (प्रभाग 5), रविंद्र (राजू) नाईक (प्रभाग 9), वितोरीनो तावारीस (प्रभाग 10),  राजू  नाईक (प्रभाग 11),

माॅडेल मडगाव -  सगुण नाईक (12), दिपाली सावळ (16) 

वायब्रंट मडगाव - सदानंद नाईक ( 6), मिलाग्रीना गोम्स (7) व कामिलो बारेटो (8), सुशांता कुरतरकर (13), रोनिता राजेंद्र आजगावकर (14).
 

संबंधित बातम्या