Goa Municipal Corporation Election Result 2021: प्रतिमा कुतिन्होची लूईझीन फालेरोंवर आगपाखड

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

प्रतिमा कुतिन्हो यांनी या पराभवास माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो यांना जबाबदार धरून त्यांच्यावर आगपाखड केली आहे.

मडगाव: (Goa Municipal Election Result 2021 Image Coutinhos fire on Luizin Faleron) जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघाची पोटनिवडणूक अवघ्या 372 मतांनी हरलेल्या काॅंग्रेसच्या उमेदवार व गोवा प्रदेश महिला काॅंग्रेसच्या अध्यक्ष अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी या पराभवास माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो यांना जबाबदार धरून त्यांच्यावर आगपाखड केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघाच्या उमेदवारीवर आपण दावा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

स्थानिक आमदार असलेले फालेरो यांनी आपल्या प्रचारकार्यात सहभाग घेतला नाही. या निवडणुकीत काॅंग्रेसचे चिन्ह असू नये तसेच उमेदवारही असू नये असे त्यांचे मत होते. मतदानाच्या दिवशीही ते नावेली मतदारसंघात फिरकले नाहीत. त्यांनी या निवडणुकीत अजिबात रस घेतला नाही. त्यांनी प्रचारकार्यात भार घेतला असता तर आपण निवडून आले असते असे कुतिन्हो यांनी सांगितले. (Goa Municipal Election Result 2021 Image Coutinhos fire on Luizin Faleron)

Goa Municipal Election Result 2021: कुंकळ्ळीच्या नगराध्यक्षपदी लक्ष्मण नाईक

`नावेली मतदारसंघातील लोक फालेरो यांना कंटाळलेले आहेत. फालेरो कुठे गायब झाले असे  प्रचाराच्या दरम्यान मतदार मला विचारत होते. मागच्या विधानसभा निवडणुकीत नावेलीत अन्य योग्य उमेदवार नसल्याने आपण उभे राहिलो असे फालेरो सांगत होते. पुढच्या विधानसभा निवडणुकीत नावेलीच्या उमेदवारीसाठी मी दावा करणार आहे` असे कुतिन्हो यांनी सांगितले. 

नावेली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दवर्ली व नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघांतील उमेदवार पराभूत होतात हे फालेरो यांच्यासाठी लज्जास्पद बाब आहे, अशी टिका कुतिन्हो यांनी केली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्यावरही कुतिन्हो यांनी टिका केली. विजयी झालेले अपक्ष उमेदवार एडविन कार्दोझ यांना आलेमाव यांनी दिलेला पाठिंबा म्हणजे नावेली मतदारसंघात मागच्या दारातून केलेला प्रवेश आहे. भाजपचा ब सघ असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे, असे कुतिन्हो यांनी सांगितले. 
 

संबंधित बातम्या