Goa Municipal Election Result 2021: फेरमतमोजणीत जाॅनी क्रास्टो विजयी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 एप्रिल 2021

अटीतटीची लढत झालेल्या मडगाव पालिकेच्या प्रभाग दोनमध्ये गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलचे जाॅनी क्रास्टो यांना विजयी घोषित करण्यात आले.    

मडगाव : अटीतटीची लढत झालेल्या मडगाव पालिकेच्या प्रभाग दोनमध्ये गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलचे जाॅनी क्रास्टो (Johnny Krasto) यांना विजयी घोषित करण्यात आले.    

क्रास्टो यांनी भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलचे उमेदवार कालीदास नाईक यांच्यावर अवघ्या 8 मतांनी मात केली. नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार या प्रभागाची फेरमतमोजणी हाती घेण्यात आली. या मतमोजणीत क्रास्टो यांना 988 तर नाईक यांना 980  मते मिळाली.  (Goa Municipal Election Result 2021 Johnny Krasto wins recount) 

सरकारच्या बेजबाबदारपणामुळे 'कोरोना' नियंत्रणाबाहेर : दिगंबर कामतांचा...

मडगाव पालिकेच्या आतापर्यंत निकाल जाहीर झालेल्या 8 पैकी 5 प्रभागात फातोर्डा फाॅरवर्डचे, तर 3 प्रभागात वायब्रंट मडगावचे उमेदवार निवडून आले आहेत. 

संबंधित बातम्या