Goa Municipal Election Result 2021: कुंकळ्ळीच्या नगराध्यक्षपदी लक्ष्मण नाईक

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

कुंकळ्ळीचे माजी नगरसेवक व सीईएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य लक्ष्मण नाईक हे कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष असतील.

मडगाव ः  कुंकळ्ळीचे माजी नगरसेवक व सीईएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य लक्ष्मण नाईक हे कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष असतील. कुंकळ्ळी पालिका निवडणुकीत 9 उमेदवार निवडून आलेल्या काॅंग्रेस पॅनलचे नेते युरी आलेमाव यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व माजी नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. 

Goa Municipal corporation election Result 2021: कारापूर-सर्वण पंचायत पोटनिवडणुकीत गोकुळदास सावंत विजयी, भाजप मंडळ तोंडघशी 

उपनगराध्यक्षपदी झेवियर (अ‍ॅथनी) वाझ यांचे नाव युरी आलेमाव यांनी जाहीर केले. या निवडणुकीत 14 पौकी 9 प्रभागात काॅंग्रेस पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने युरी व ज्योकीम आलेमाव यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

Goa Municipal corporation election Result 2021: नावेली झेडपी पोटनिवडणुकीत एडविन कार्दोझ यांचा विजयी 

संबंधित बातम्या