गोवा नगरपालिका निवडणुक प्रभाग आरक्षणाला थेट न्यायालयात आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर केल्यानंतर आता त्याला विरोध होऊ लागलेला आहे.  

पणजी: नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर केल्यानंतर आता त्याला विरोध होऊ लागलेला आहे.  काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी या आरक्षणाला आता न्यायालयात आव्हान देऊ असे आज पणजी येथे सांगितले. ते म्हणाले विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र सत्ताधारी भाजपकडून रचले जात आहे.

उदाहरण द्यायचे झाल्यास मडगाव मध्ये सलग तीन प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत.विरोधी पक्षांना अनुकूल असणारे प्रभाग आरक्षित करून भाजप राजकीय खेळी खेळत आहेआहे. पंचायत संचालनालयाकडून हे आरक्षण केले गेले असले तरी सर्व काही भाजप पक्ष संघटनेच्या सूचनेनुसार होत असावे असे घडत आहे. सरकारी कारभारात भाजपचा राजकीय हस्तक्षेप वाढलेला आहे. प्रत्येक वेळेला न्यायालयात जाऊन दाद मागावी लागत आहे. विरोधकांना नमोहरम करण्याची ही भाजपची खेळी आहे. विधानसभेत दिलेले आश्वासन देखील सरकार पाळत नाही यावरून सरकारची मानसिकता दिसते.

Goa Budget 2021: शेती-समुद्र या घटकांवर गोव्याची अर्थव्यवस्था टिकणार -

गोवा सरकारला केंद्रीय योजनांची भरीव मदत: पशुसंवर्धन मंत्री गिरीराजसिंह -

संबंधित बातम्या