गोवा नगरपालिका निवडणूक 20 मार्चला; आजपासून आचारसंहिता लागू

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

गोव्यातील नगरपालिका निवडणूक 20 मार्चला घेण्यात येणार आहे. गोवा राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

पणजी : गोव्यातील नगरपालिका निवडणूक 20 मार्चला घेण्यात येणार आहे. गोवा राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पणजीसह इतर 11 पालिकांसाठीची निवडणूक 20 मार्चला पार पडणार असून, मतमोजणी 22 मार्चला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यात आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी दिली. 

जीएसटी नुसान भरपाईसाठी गोव्याला केंद्राकडून 20 कोटींचा निधी

दरम्यान, गोवा नगरपालिका निवडणूकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण आधीच जाहीर झाले आहे. त्यात घोळ झाल्याचा आरोप खुद्द भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आगामी काळात विरोधी पक्ष काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागील आठवड्यातच गोवा नगरपालिका निवडणुकच्या पार्श्वभूमीवर पूर्ण झालेल्या विकासकामांचे लवकरात लवकर लोकार्पण करण्याचे आदेश दिले होते.  

संबंधित बातम्या