गोवा नगरपालीका निवडणूक: गोवा नगरपालिका निवडणूक मार्च अखेरीस

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

राज्यातील आगामी पालिका निवडणुकीसाठी 4 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या प्रभाग आरक्षण व फेररचना अधिसूचनेला तसेच  पालिका कायद्यातील दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या नऊ याचिका सादर झाल्या आहेत.

पणजी: राज्यातील आगामी पालिका निवडणुकीसाठी 4 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या प्रभाग आरक्षण व फेररचना अधिसूचनेला तसेच पालिका कायद्यातील दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या नऊ याचिका सादर झाल्या आहेत. या याचिका आज एकत्रितपणे सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आल्या. यावेळी खंडपीठाने या सर्व याचिकांमधील प्रतिवादी असलेल्या सरकार व राज्य निवडणूक आयोगाला नोटिसा बजावल्या आहेत आणि त्यावरील अंतिम सुनावणी पुढील आठवड्यात ठेवण्यात आली आहे. पालिका निवडणुकांच्या प्रभागामधील मतदारांची यादी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे तसेच निवडणूक मार्चअखेरीस घेण्यात येणार आहे.

गोव्यातील हॉटेल व्यवसायाकडे भारतीय पर्यटकांची पाठ -

संबंधित बातम्या