मुरगाव पालिकेवर प्रशासकीय राजवट

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

सरकारने मुरगाव पालिकेवर प्रशासक म्हणून गुरुदास पिळर्णकर यांची नियुक्ती केल्यावर त्यांनी आपल्या पदाचा ताबा घेतला.तसेच नवनियुक्त मुख्याधिकारी संतोष कुंडईकर यांनीही ताबा घेतला.

 मुरगाव : सरकारने मुरगाव पालिकेवर प्रशासक म्हणून गुरुदास पिळर्णकर यांची नियुक्ती केल्यावर त्यांनी आपल्या पदाचा ताबा घेतला.तसेच नवनियुक्त मुख्याधिकारी संतोष कुंडईकर यांनीही ताबा घेतला.

गोव्यातील पालिका निवडणूका कोरोना महामारी मुळे तीन महिने लांबणीवर टाकल्या आहेत.वास्तविक ॅॅ ऑक्टोबर महिन्यात पालिका निवडणूका घेणे आवश्यक होते.पण , गोव्यात कोरोनाचा फैलाव वाढत गेल्याने राज्य निवडणूक आयोगाने तीन महिने निवडणूक पुढे ढकल्याची घोषणा केली.
  मुरगाव पालिकेच्या विद्यमान मंडळाची मुदत काल गेल्या बुधवारी (ता.४) रोजी संपुष्टात आल्यावर सरकारने मुरगाव पालिकेवर प्रशासक नियुक्त करुन पालिकेचा कारभार त्यांच्या हाती सोपविला आहे. 

  कोरोना महामारी मुळे निवडणूका पुढे ढकलण्यात आल्याने विद्यमान मंडळाला निवडणूका होईपर्यंत मुदतवाढ मिळू शकतील अशी भाबडी आशा नगरसेवकांनी बाळगली होती.पुढील निवडणूकीपर्यंत नगराध्यक्ष आपणच राहिल असा मावळते नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांची समज झाली होती पण, सरकारने नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरुन मंडळ बरखास्त केले.  दरम्यान, विद्यमान पालिका मंडळ बरखास्त झाले असले तरी मावळत्या मंडळातील बहुतेक नगरसेवक पालिकेत ये जा करुन जनतेची कामे करताना दिसून आले.

मुख्याधिकारी बुगडे यांची बदली 
मुरगाव पालिका मंडळ बरखास्त केल्यानंतर लगेचच मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांच्या बदलीचा आदेश सरकारने जारी करुन  गोवा पुनर्वसन मंडळाचे सचिव संतोष कुंडईकर यांची मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली होती त्यांनी सुद्धा आपल्या पदाचा ताबा घेऊन कामकाजाला सुरुवात केली.

वास्कोकरांना मी भरपूर दिले - श्री.राऊत
 जवळपास दिड वर्ष मी मुरगाव पालिकेचा नगराध्यक्ष पदावर राहिला या काळात वास्कोकरांसाठी भरभरून काम केले असा दावा मावळते नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केला आहे.वास्कोतील जनतेचे स्वप्न असलेले मासळी मार्केट उभारण्यास चालना दिली.त्यासाठी निधी उपलब्ध केला असे श्री.राऊत यांनी सांगितले.पालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी असलेले डार्क स्पाॅट सुशोभित केले.शहराला झळाळी आणण्यासाठी सर्वोत्तपरी सहाय्य केले ,बायणा पावर हाऊस आणि पालिका इमारत नुतनीकरण या कामासाठी निधी उपलब्ध करून ठेवला असे श्री.राऊत यांनी  सांगितले.

संबंधित बातम्या