Goa Municipal Elections Result 2021 : मडगाव नागरी युतीचे 9, तर वायब्रंट मडगावचे 3 उमेदवार विजयी

Goa Municipal Elections Result 2021 : मडगाव नागरी युतीचे 9, तर वायब्रंट मडगावचे 3 उमेदवार विजयी
Goa Municipal Elections Result 2021 9 candidates from Madgaon Civil Alliance and 3 candidates from Vibrant Madgaon won

मडगाव : मडगाव पालिकेच्या (margao municipal elections) मतमोजणीच्या तिसऱ्या टप्प्यातील चारपैकी तीन प्रभागात गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलचे 3 तर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या माॅडेल मडगाव  पॅनलचा एक उमेदवार निवडून आला आहे. या निवडणुकीत फातोर्डा फाॅरवर्ड व माॅडेल मडगाव पॅनलने एकत्र येऊन स्थापन केलेल्या मडगाव नागरी युतीचे आतापर्यंत 9, तर भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. 

प्रभाग 12 मध्ये वायब्रंट मडगावचे शर्मद रायतुरकर व माॅडेल मडगावचे सगुण (दादा) नाईक यांच्यात अटितटीची लढत झाली असून सगुण नाईक अवघ्या 11 मतांची आघाडी घेऊन निवडून आले आहेत. रायतुरकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याने या प्रभागाची फेरमतमोजणी सुरु आहे.(Goa Municipal Elections Result 2021 9 candidates from Madgaon Civil Alliance and 3 candidates from Vibrant Madgaon won)

तिसऱ्या टप्प्यातील मतमोजणीत फातोर्डा फाॅरवर्डचे रविंद्र (राजू) नाईक (प्रभाग 9) वितोरीनो तावारीस (प्रभाग 10, व  राजू  नाईक (प्रभाग 11) हे निवडून आले. 

आतापर्यंत निकाल जाहीर झालेल्या 12 प्रभागात फातोर्डा फाॅरवर्डचे  फ्रान्सिस जोन्स (प्रभाग 1), जाॅनी क्रास्टो (प्रभाग 2), लिंडन परेरा (प्रभाग 3) पूजा नाईक (प्रभाग 4), श्वेता लोटलीकर (प्रभाग 5), रविंद्र (राजू) नाईक (प्रभाग 9), वितोरीनो तावारीस (प्रभाग 10),  राजू  नाईक (प्रभाग 11), वायब्रंट मडगावचे सदानंद नाईक (प्रभाग 6), मिलाग्रीना गोम्स (प्रभाग 7) व कामिलो बारेटो (प्रभाग 8) व माॅडेल मडगावचे सगुण नाईक (प्रभाग 12) हे निवडून आले आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com