Goa Municipal Election 2021: चावडी मतदान केंद्रावर अपंग पुरूष व्हिल चेअरवरून मतदान करताना

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

मतदान केंद्राबाहेर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घ्यायच्या काळजीचे फलक मतदार जागृती साठी लावलेले दिसत होते.

काणकोण: (Goa Municipal Election 2021 Handicapped men voting in wheelchairs at Chawdi polling station) काणकोण पालिकेच्या बारा प्रभागात सकाळी दहा वाजे पर्यत मतदान संथ गतीने झाले. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली दहा वाजेपर्यत फक्त 21.80 टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. अकरा नंतर कांही मतदार केंद्रावर महिला मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या.

Municipal Corporation Election 2021: कुंकळ्ळीत साडेअकरापर्यंत 27 टक्के मतदान

बारा प्रभागात एकूण 10557 मतदार असून त्यापैकी 5948 पुरूष व 5209 महिला मतदार आहेत. कोणत्याच मतदान केंद्र किंवा प्रभागात  शांतता भंग होण्याचा प्रकार घडला नाही. सर्वच प्रभागात नाक्यानाक्यावर पोलिस तैनात करण्यात आले होते. त्याच प्रमाणे मतदान केंद्राबाहेर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घ्यायच्या काळजीचे फलक मतदार जागृती साठी लावलेले दिसत होते. 

संबंधित बातम्या