Goa: मुरगाव नगरपालिकेचे वास्कोतील मासळी मार्केट लवकरच होणार तयार!

वास्कोतील (Vasco) मोठ्या आस्थापना बरोबर पालिका मार्केट,(Market) पालिका संपत्ती व्यवसाय करणाऱ्यांनी अनेक वर्षे थकबाकी दिलेली नसून त्याने थकबाकी देण्यासाठी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन यांनी केले.
Goa: मुरगाव नगरपालिकेचे वास्कोतील मासळी मार्केट लवकरच होणार तयार!
वास्को सुडातर्फे देव दामोदर ट्रस्टच्या जागेमध्ये उभारलेले मासळी मार्केट.Dainik Gomantak

दाबोळी: राज्य नगरविकास संस्था (सुडा) तर्फे मुरगाव नगरपालिकेचे (Municipal) वास्को येथील मासळी मार्केट बांधकामाची सर्व तयारी केली आहे. लवकरच पूर्वीच्या मासळी मार्केटमधील विक्रेत्या तात्पुरते उभारण्यात आलेल्या मासळी मार्केटमध्ये स्थलांतर करणार असल्याची माहिती मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत तारी यांनी दिली. तसेच मुरगाव नगर पालिकेला येणारी थकबाकी लवकरच गोळा करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तारी यांनी दिली.

वास्को जुन्या बसस्थानकाशेजारी (Bus Stand) असलेल्या पूर्वीच्या मासळी मार्केटचे बांधकाम लवकरच राज्य नगर विकास संस्था (सुडा) तर्फे सुरू करण्यात येईल. मुरगाव नगरपालिके अंतर्गत येणाऱ्या मासळी मार्केटचे बांधकाम पूर्ण साधनसुविधाने उपलब्ध असणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तारी यांनी दिली. यासाठी येत्या काही दिवसातच येथील मासळी विक्रेत्यांची तात्पुरती, राज्य महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या देव दामोदर ट्रस्टच्या जागेत करण्यात येईल.

सुडा तर्फे अंदाजे 80 लाख रुपये खर्च करून देव दामोदर ट्रस्टच्या जागेत तात्पुरते मासळी मार्केट उभारले असून येथे मासळी विक्रेत्याबरोबर मासे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या आहे. येत्या काही दिवसात पूर्वीच्या मासळी मार्केट मधील विक्रेत्या तात्पुरती उभारलेले मासळी मार्केटमध्ये आपला व्यवसाय सुरु करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी (CO) तारी यांनी दिली. तात्पुरते बांधलेल्या मासळी मार्केटमध्ये वाहन पार्किंग, महिला पुरुषासाठी सौचालय व इतर चांगल्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.

वास्को सुडातर्फे देव दामोदर ट्रस्टच्या जागेमध्ये उभारलेले मासळी मार्केट.
साखळी येथे हिंदु जागृत नागरिकांतर्फे काँग्रेसचे जेष्ठ नेते सलमान खुर्शिद यांचा तीव्र निषेध

मुरगाव नगरपालिकेत वास्कोत असलेल्या मोठ्या आस्थापना बरोबर पालिका मार्केट व इतर पालिकेची मालमत्ता येत असलेल्या अंदाजे शंभर कोटी पेक्षा जास्त महसूल येणे असल्याची माहिती मुख्याधिकारी (CO) तारी यांनी दिली. पालिकेचे शंभर कोटी पेक्षा जास्त थकबाकी असल्यास पालिकेवर आलेली आर्थिक टंचाई कायमस्वरूपी दूर होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तारी यांनी दिली. यासाठी मुख्याधिकारी तारी यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू करण्याचे निश्चित केले आहे.

वास्कोतील मोठ्या आस्थापना बरोबर पालिका मार्केट, पालिका संपत्ती व्यवसाय करणाऱ्यांनी अनेक वर्षे थकबाकी दिलेली नसून त्याने थकबाकी देण्यासाठी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन यांनी केले आहे. मुरगाव नगरपालिकेचा महसूल वाढवण्यासाठी उर्वरित राहिलेली थकबाकी येणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे शेवटी तारी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com