Goa Murder Case: चौकशीत राजकीय हस्तक्षेप नकोच

पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊनच तपासाची दिशा बदलली असा आरोप
Goa Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak

मडगाव: ज्यावेळी पोलिस (Police Investigations) तपासात राजकारणी (political interference) हस्तक्षेप करतात, त्याचवेळी पोलीस तपास भरकटतो. सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणीही (Goa Murder Case) हेच झाले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळेच सिद्धीचा मारेकरी अजून मोकाट आहे, असा आरोप बाणावली येथे काढण्यात असलेल्या मेणबत्ती मोर्चा मिरवणूकीच्यावेळी करण्यात आला.

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणी त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊनच तपासाची दिशा बदलली असा आरोप केला. आपचे दक्षिण गोवा निमंत्रक कॅ. व्हेंझी व्हिएगस यांनी सध्या राजकारण्यामुळे संपूर्ण राज्यात गुंडगिरी पसरली आहे. या गुंडांना राजकीय संरक्षण मिळत असल्यामुळेच अशी कुकर्मे करण्यास ते धजवतात. काही महिन्यांपूर्वी बाणावलीतही दोन अल्पवयीन मुलीवर अशाच प्रकारे सामूहिक बलात्कार झाला. बाणावलीत शांतता प्रस्थापित करायची असेल, तर कलंकित राजकारणी घरी बसले पाहिजेत, असे ते म्हणाले.

Goa Murder Case
Goa Murder Case: पोलिसांकडून लपवाछपवी, पुरावेही नष्ट

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचे सध्या राज्यभरात पडसाद उमटत असून राज्य महिला आयोगाने देखील या प्रकरणाची दखल घेतलेली आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालक तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. सदर प्रकरण हे दुर्दैवी आहे, असे प्रकार भविष्यात आणखी घडू नयेत, यासाठी काय पावले उचलायला हवीत, यावर आता विचारविनिमय होण्याची गरज आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे यांनी सांगितले.

याप्रकरणी प्रसारमाध्यमात तपास नीट न झाल्याच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्यांच्या आधारे महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतलेली आहे. या प्रकरणात आवश्यक तपास प्रक्रिया झालेली आहे, की नाही याची विचारणा पोलिस महासंचालकांकडे पत्रव्यवहार करून करण्यात आलेली आहे. तशी प्रक्रिया झालेली नसल्यास व तपास अधिकाऱ्याकडून काही चूक झालेली असल्यास तसे का झालेले आहे? यासंदर्भात चौकशी करून आयोगाला अहवाल सादर करावा, असे सांगण्यात आलेले आहे, असे गावडे यांनी सांगितले.

पोलिसांना मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली असतात. त्यानुसार त्यांनी प्रक्रिया करायला हवी. आयोगाला अहवाल मिळाल्यानंतर चित्र काय ते स्पष्ट होईल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशीही आपण बोलणी केलेली आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठविले जाणार आहे, असे गावडे यांनी सांगितले.

Goa Murder Case
Goa Murder Case: समाजमाध्यमांतून संतप्‍त प्रतिक्रिया; 'या प्रकरणाला सरकारच दोषी'

कर्तव्यांची जाणीव

अलीकडच्या काळातील महिलांविषयक वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर तसेच सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणानंतर विरोधकांकडून राज्य महिला आयोगावर टीका झाली होती. या अनुषंगाने बोलताना गावडे म्हणाल्या, महिला आयोगाला आपल्या कर्तव्यांची जाणीव असून आयोगाकडून आपले कार्य व्यवस्थित पार पाडले जात आहे. प्रत्येक कामाची प्रसिद्धी करण्याची गरज असतेच असे नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com