Goa Murder Case: चौकशी ‘SIT’कडे देण्याच्या हालचाली सुरू

व्हिसेरा ठेवण्यात आला नसल्याने पोलिस व डॉक्टर हे प्रकरण (Goa Murder Case) अंगलट आल्याने एकमेकावर ढकलत आहेत.
Goa Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak

पणजी: सिद्धी नाईक हिच्या मृत्युप्रकरणी (Goa Murder Case) वेगवेगळ्या दोन पोलिस (Police Station) स्थानकातून होत असलेला तपास, जबानीत विसंगती व सखोल चौकशीसाठी समाजातून होणारी मागणी यामुळे या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अनुभवी व वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याकडे ते दिले जाण्याची शक्यता आहे. विविध समाज घटक व आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाचा विरोधकांकडून वाढत चाललेल्या आक्रमकतेमुळे सरकारकडून सावध पावले उचलण्यात येत आहेत.

म्हापसा पोलिस स्थानकात सिद्धी नाईक हिच्या बेपत्ताची तक्रार दाखल झाली होती, तर कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर तिचा मृतदेह सापडला होता त्यामुळे कळंगुट पोलिस स्थानकात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या दोन्ही स्थानकाचे पोलिस निरीक्षक आपापल्या परीने तपासकाम करत आहेत. आतापर्यंत अनेकांच्या नोंदविण्यात आलेल्या जबान्यांमध्ये बरीच विसंगती सापडली आहे त्यामुळे तपासकामातही अडथळे येत आहेत. सिद्धी नाईक हिचे कपडे अजूनही सापडलेले नाहीत. त्यामुळे पोलिसही सैरवैर झाले आहेत. या जबान्यांतून काही माहिती मिळवण्यात आली असली तरी तिच्या आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेली नाही. दोन्ही पोलिस स्थानकाऐवजी या प्रकरणाचा तपास एकाच अधिकाऱ्याने करावा असे मत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे झाले असून त्यासंदर्भात काही पोलिस अधिकाऱ्यांना विचारण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.

Goa Murder Case
Goa Murder Case: तरूणीच्या वडिलांच्या पोलिस स्टेशनला फेऱ्या

सिद्धी नाईक हिच्या शव चिकित्सेच्या अहवालाचे नव्याने मत घेण्यासाठी पुन्हा गोमेकॉ इस्पितळाच्या डीनकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे निर्देश पोलिस प्रमुखांनी अधीक्षकांना दिले आहेत. अधीक्षकांनी त्याचा मसुदा तयार करून ठेवला आहे मात्र तो कोणी पाठवायचा यावर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. ज्या पोलिस सर्जननी शव चिकित्सा करून अहवाल दिला त्यांच्याकडे अहवाल अभिप्रायासाठी न गेल्यास व दुसऱ्या डॉक्टरांच्या पॅनलकडे गेल्यास बिंग फुटेल यामुळे पोलिसही तणावाखाली आहेत. म्हणून तो अजून पाठविलेला नाही अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, सिद्धी नाईक हिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर सापडला त्यावेळी पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक व निरीक्षक यापैकी कोणीही घटनास्थळी गेले नाहीत. एका अननुभवी महिला उपनिरीक्षकाला त्या ठिकाणी पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी शव चिकित्सा झाल्यानंतर पोलिस सर्जनने (डॉक्टर) तिचा मृत्यू बुडून झाल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला गेला.

Goa Murder Case
धक्कादायक! वडिलानेच केला 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

हे सर्व काही अतिघाईने करण्यामागे तसेच अशा प्रकरणात व्हिसेरा मागे न ठेवण्यामागे कोणती कारणे होती यावर पोलिस अजून स्पष्ट उत्तर देऊ शकलेले नाहीत. व्हिसेरा ठेवण्यात आला नसल्याने पोलिस व डॉक्टर हे प्रकरण अंगलट आल्याने एकमेकावर ढकलत आहेत.

पोलिसांकडून पत्र नाही : डीन बांदेकर

सिद्धी नाईक हिच्या शव चिकित्सेच्या अहवालासंदर्भात नव्याने अभिप्रायासाठी पोलिस खात्याकडून पत्र पाठवण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. ते पत्र पोहचले आहे का यासंदर्भात गोमेकॉ इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, आजपर्यंत पोलिसांकडून कोणतेच पत्र आलेले नाही.

सुनीता सावंत यांचे नाव चर्चेत

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास अनुभवी व वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांकडे देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. पोलिस खात्यातील महिला अधिकाऱ्यांमध्ये क्राईम ब्रँचच्या उपअधीक्षक सुनीता सावंत यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com