Goa Murder Case: पिडीतेला बुडवूनच मारल्याची शक्यता

तज्ज्ञांच्या अहवालामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले.
Goa Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak

पणजी: राज्यात (Goa) गाजत असलेल्या सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. सिद्धी नाईक हिचा शवचिकित्सेचा वैद्यकीय तज्ज्ञांचा फेरअहवाल पोलिसांना मिळाला असून त्यात सिद्धीचा मृत्यू बुडूनच झाल्याचे म्हटले आहे. तिला बुडवून मारले असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नव्या अहवालामध्ये सर्वप्रकारच्या शक्यता ग्राह्य धरून मृत्यूचे नेमके कारण शोधा, असा सल्ला देण्यात आला आहे. यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तपासाची दिशा ठरवत आहेत. तज्ज्ञांच्या या अहवालामुळे आता या प्रकरणाच्या (Goa Murder Case) तपासाला गती मिळेल ही अपेक्षा आहे.

Goa Murder Case
Goa Murder Case: गोमेकॉ इस्पितळाच्या डीनला पत्र

नास्नोळा - हळदोणे येथील सिद्धी नाईक हिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत कळंगुट किनाऱ्यावर 12 ऑगस्ट रोजी आढळून आला होता. आता एक महिना उलटला असतानाही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्याचे असल्याचे सांगत डॉक्टरांना व्हिसेरा आणि इतर स्वॅब नमुने ठेवण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे डॉक्टरांनी व्हिसेरा आणि इतर नमुने ठेवले नव्हते. शिवाय पोलिसांनीही आत्महत्येच्या दिशेने तपास केला होता. त्यानंतर सिद्धीचे वडील संदीप नाईक यांनी कळंगुट पोलिसात आपल्या मुलीला बुडून मारल्याचे तक्रार नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला होता.

Goa Murder Case
Goa Murder Case: पोस्टमॉर्टम रिपोर्ट माहित नसल्याने पिडितेचे वडिल अंधारातच

या प्रकरणातला व्हिसेरा रिपोर्ट नसल्याने अगोदरच्या शवचिकित्सा अहवालाचे वैद्यकीय तज्ञ समितीकडून फेरचिकित्सा केली गेली या तज्ञ समितीमध्ये पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. वाइसमन पिंटो, स्त्री विभागाचे प्रमुख डॉ. गुरुप्रसाद पेडणेकर, शवागार प्रमुख डॉ.आंद्रे फर्नांडिस यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com