Goa: अमर नाईक यांचा खून प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन झाला

खून करण्यासाठी त्या मुलीच्या परिवाराने रवी शंकर यादव यांना पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती अशी माहिती पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग (Superintendent Pankaj Kumar Singh) यांनी दिली.
अमर नाईक यांचा खून (Murder) प्रेम प्रकरणातून (love affair) सुपारी देऊन करण्यात आल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस (South Goa Police) अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली.
अमर नाईक यांचा खून (Murder) प्रेम प्रकरणातून (love affair) सुपारी देऊन करण्यात आल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस (South Goa Police) अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली. Dainik Gomantak

दाबोळी: बोगमाळो रंगवी इस्टेट परिसरात नवे वाडे येथील अमर नाईक (Amar Naik) यांचा खून (Murder) प्रेम प्रकरणातून (love affair) सुपारी देऊन करण्यात आल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस (South Goa Police) अधीक्षक पंकज कुमार सिंग (Superintendent Pankaj Kumar Singh) यांनी दिली. खून करण्यासाठी त्या मुलीच्या परिवाराने रवी शंकर यादव यांना पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती अशी माहिती पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली.

सोमवारी रात्री दिनांक १९ रोजी वास्को पोलीस स्थानकावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून वरील माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली. नवे वाडी येथील अमर नाईक याचे तीन-चार वर्षांपूर्वी एका मुस्लिम मुलीबरोबर प्रेम होते. हे प्रेम प्रकरण त्या मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते.त्यानुसार त्या मुलीच्या भावाने अमर नाईक याचा काटा काढण्यासाठी उत्तर प्रदेश येथील रविशंकर यादव याला पाच लाखांची सुपारी दिली होती अशी माहिती पंकज कुमार सिंग यांनी दिली. त्याचा काटा काढण्यासाठी रविशंकर यादव यांनी उत्तर प्रदेश ते मुंबई व मुंबई ते गोवा रेल्वे प्रवास करून त्यातील आपल्या भावाच्या हॉटेलमध्ये वास्तव्य केले. पुढे त्याने आपले उत्तर प्रदेश येथील गाव बंधू मुंबई मध्ये कामधंदा करणारे शैलेश गुप्ता व शिवम सिंग यांना संपर्क साधून अमर नाईक याचा काटा काढण्यासाठी षडयंत्र रचले. संपर्क साधल्यावर ते तयार झाले त्यांचा सौदा झाल्यावर त्यांना त्याची गरज भासल्याने रविशंकर नेत्यांना पुरविली त्यानंतर ते गोव्यात सहा जुलैला आले. त्यानी निर्जन जागेची रेकी करून ते पुन्हा मुंबईला गेले. त्यानंतर गुरुवारी त्यांनी त्याचा काटा काढला. मात्र त्यांच्या कारने त्यांना दगा दिल्याने त्यांना गोव्याबाहेर पसार होता आले नाही. आरोपी शैलेश व शिवम यांनी गोव्यात येऊन नियोजन करून अमर नाईक याला गाठून त्याला रंघवी इस्टेटमध्ये नेऊन शैलेश गुप्ता यांने अमर नाईक याच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली.

अमर नाईक यांचा खून (Murder) प्रेम प्रकरणातून (love affair) सुपारी देऊन करण्यात आल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस (South Goa Police) अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली.
Goa: अमर नाईक हत्या प्रकरणाची सूत्रे दुबईत?

अमर नाईक याचे मुस्लिम मुली बरोबर गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रेम होते याची माहिती त्या मुलीच्या विदेशात असलेल्या भावाला व त्याच्या परिवाराला मिळाल्यानंतर त्याचा या प्रेम-प्रकरणाला विरोध होता. तसेच अमर याचा काटा काढण्यासाठी विदेशात असलेल्या मुलीच्या भावाने आपल्या उत्तर प्रदेशातील मित्र रवी शंकर यादव याच्याशी संपर्क साधून अमर नाईक यांची माहिती दिली व त्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी देऊन काटा काढण्यास सांगितले.त्यानुसार रवी शंकर यादव याने आपले उत्तर प्रदेशातील गाव बंधू शैलेश रामसारे गुप्ता व शिवम सर्वजीत सिंग यांच्याशी संपर्क साधून पुढील कट रचला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सिंग यांनी दिली. अमर नाईक यांचा खून कसा करण्यामागील नेमके कारण कोणते यासंबंधी रविशंकर याच्याकडून बोलते करून घेण्यात आले असून ही सुपारी देण्यामागील कारण ही स्पष्ट झाले आहे. त्यासंबंधी पोलीस खात्री करून घेत आहे. रविशंकर हा काही वर्षे वास्कोत राहिल्याने त्या व्यक्तीची ओळख झाली. त्यामुळे त्यांनी रविशंकर कडे संपर्क साधून त्यांना सुपारी दिली अशी माहिती पंकज कुमार सिंग यांनी दिली. पुढील तपास चालू असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com