Goa : प्रतिष्ठेच्या गुलाब पुरस्काराचे मानकरी जाहीर

यंदाच्या पुरस्कारासाठी (Awards) डॉ. कार्लोस एम फर्नांडिस, रेव्ह.फा. मानुएल गोम्स व विल्सन माझारेलो यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. कार्लोस एम फर्नांडिस, रेव्ह.फा. मानुएल गोम्स , विल्सन माझारेलो
डॉ. कार्लोस एम फर्नांडिस, रेव्ह.फा. मानुएल गोम्स , विल्सन माझारेलोDainik Gomantak

फातोर्डा : गुलाब या कोकणी मासिकाने (Konkani Magazine) 2020 सालचे प्रतिष्ठेच्या गुलाब पुरस्काराचे (Gulab Awards) मानकरी जाहीर केले आहेत. हे पुरस्कार (Awards) फादर फ्रेडी जे द कॉस्ता स्मृती ट्रस्टच्या सहकार्याने दिले जातात. यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. कार्लोस एम फर्नांडिस, रेव्ह.फा. मानुएल गोम्स व विल्सन माझारेलो यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. कार्लोस एम फर्नांडिस, रेव्ह.फा. मानुएल गोम्स , विल्सन माझारेलो
Goa : वास्‍कोत ‘डेंग्‍यू’ने वाढवला ताप!

डॉ. कार्लोस फर्नांडिस हे गोवा विद्यापीठात वाचनालयाचे प्रमुख आहेत. शिवाय ते वाचनालय व माहिती विज्ञान विषयांचे सहाय्यक प्रोफेसर आहेत. त्यांची वर्षाचे व्यक्तिमत्व या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रसिध्द कोकणी लेखक, इतिहासकार रेव्ह:फा. मानुएल गोम्स यांचा वर्षाचा लेखक या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

डॉ. कार्लोस एम फर्नांडिस, रेव्ह.फा. मानुएल गोम्स , विल्सन माझारेलो
Goa Politics : महिला कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणणार

गुलाब तियात्रिस्ट पुरस्कारासाठी विल्सन माझारेलो यांची निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार स्व. फादर फ्रेडी जे द कॉस्ता यांच्या जयंती दिनी म्हणजे 20 जुलै या दिवशी दिले जातात. पण यंदा हे पुरस्कार त्या दिवशी देण्यात येणार नाहीत. पण गुलाब मासिकातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या खास कार्यक्रमात त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या पुरस्कारांसाठीचे मानकरी ग्वादालुप डायस, फा. आवे मारिया आफोंस, मार्कोस गोन्साल्विस, ब्र. जॉनआफोंसो व पियो इस्तिव्स यांचा समावेश असलेल्या समितीने निवडले आहेत. ही माहिती गुलाबचे संपादक फाउस्तो व्ही द कॉस्ता यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com